WATCH :वर्ध्यामध्ये नागाचा थरार, मुलीच्या गळ्याला विळखा दोन तास रंगला थरार, शेवटी तो डसलाच


वृत्तसंस्था

वर्धा : वर्ध्यात झोपलेल्या मुलीच्या गळ्याला नागाने विळखा घेतल्याची घटना घडली आहे. मुलीच्या अंगावर तब्बल दोन तास हा नाग ठाण मांडून होता. दोन तासानंतर त्याने मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला.Naga Squeeze the girl’s neck in Vardha

मुलीस सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. अंगावर काटा आणणारी ही घटना तालुक्याच्या बोरखेडी (कला) येथे घडली.बोरखेडी कला येथील पूर्वा पद्माकर गडकरी (वय ६ ) ही तिच्या आईसोबत शुक्रवारी रात्री जमिनीवर अंथरूण टाकून झोपली होती. रात्री १२ च्या सुमारास एक नाग मायलेकींच्या अंगावर चढला.आईला जाग आल्यामुळे ती बाजूला झाली. परंतु, तो साप मुलीच्या गळ्याला विळखा घालून फणा काढून असल्यामुळे तिला स्तब्ध राहण्यास सांगितले. सर्प मित्राला सुद्धा बोलविले. अनेकांनी धाव घेतली परंतु, उपाय चालला नाही. तर बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे धोका वाटल्याने तो सुद्धा जागा सोडण्यास तयार नव्हता. हा थरार तब्बल दोन तास चालला.

उपस्थितांच्या अंगावर शहारे आले तर त्या मुलीची अतिशय दयनीय झाली होती, शेवटी रात्री २ च्या सुमारास त्या सापाने मुलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सापाची शेपटीचा भाग मुलीच्या पाठीखाली दबून होता. त्यामुले सापाने अखेर त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला.

 • मुलीच्या अंगावर दोन तास हा नाग ठाण मांडून होता
 •  पूर्वा पद्माकर गडकरी (वय ६ ) ,असे मुलीचे नाव
 • तो नाग गळ्याला विळखा घालून फणा काढून होता
 • आईने तिला स्तब्ध झोपून राहण्यास सांगितले
 •  सुमारे दोन तास हा थरार सुरु होता
 •  अखेर नागाने गर्दी पाहून सटकण्याचा प्रयत्न केला
 • शेपटीचा भाग मुलीच्या अंगाखाली दाबला होता
 •  नाग मुलीला दंश करुन अचानक नाहीसा झाला
 • मुलीला सेवाग्राम अतिदक्षता विभागात दाखल केले

Naga Squeeze the girl’s neck in Vardha

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात