पुण्यात आदर्श घोटाळ्याची पुनरावृत्ती, माजी सैनिकांच्या जमिनीवर उभारला अनधिकृत प्रकल्प


विशेष प्रतिनिधी

पुणे : मुंबईत झालेल्या बहुचर्चित आदर्श घोटाळ्याची पुण्यात पुनरावृत्ती झाली आहे.माजी सैनिकांच्या जमिनीवर अनधिकृत प्रकल्प उभारणत आला आहे. जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यामध्ये बड्या राजकारण्यांचे हितसंबंध असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.Another Adarsh ​​scam in Pune, unauthorized project set up on ex-servicemen’s land

भारतीय सैन्य दलातील अनेक माजी सैनिकांच्या नावे धानोरी येथे असलेल्या जमिनीवर हा प्रकल्प आहे. माजी सैनिक आप-आपल्या मुळ गावी स्थायिक झाल्याचा गैरफायदा घेत पुणे महापालिका व जिल्हा भूमी अभिलेखचे अधिकाऱ्यांनी संगमत करून जमीन घोटाळा केल्याचे समोर आले आहे.



सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल असलेल्या जमिनीची महापलिका हद्दीतील धानोरी येथील मुंजाबा वस्ती सर्वे क्रमांक २९ येथे “मंत्रा 29 गोल्ड कॉस्ट “ नावे बांधकाम प्रकल्पाचे काम चालू आहे. या मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर मोजणी करून जमीन बळकावल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे महापालिका आणि भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्‍यांना हाताशी धरून ही फसवणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित घनशाम गुप्ता, मुकेश घनशाम गुप्ता, किशोर पोपटलाल गाडा, निलेश पोपटलाल गाडा व अन्य आरोपींविरुद्ध विविध गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी विशाल खंडागळे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. यामधील एक माजी सैनिक राजेंद्र सिंग यांच्या मालकीची देखील ९ गुंठे जमिन या प्रकल्पात आहे. या जमिनी बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये २००९ सालापासून दावा प्रलंबित आहे.

याचाच फायदा घेऊन आरोपी यांनी सर्वोच्च न्यायालयामधील प्रलंबित दाव्याबाबत बनावट माहितीच्या आधारे पुणे जिल्हा भूमी-अभिलेख व पुणे महानगरपालिका अधिकारी यांच्यात संगनमत करून खोटे शपथपत्र सादर करून “मंत्रा २९ गोल्ड कॉस्ट “ हा बांधकाम प्रकल्प मंजूर करून घेऊन जागा मालक याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या बाबत माजी सैनिक राजेंद्र सिंग यांचे कुलमुखत्यार धारक विशाल सत्यवान खंडागळे यांचे वकील डॉ. विक्रम अमोलिक यांनी प्रथम वर्ग न्यायालय, खडकी यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली. न्यायालयाने आरोपींवर कलम १५६ (३) नुसार विश्रातवाडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

यातील आरोपी मंत्रा 29 गोल्ड कोस्ट डेव्हलपर्सचे भागीदार आहेत. त्यांनी ही जागा 2009 ते 2021 या काळात त्यांच्या वहिवाटीच्या जागेपैकी प्लॉट क्रमांक 16, 20 व 21 या जागेची भूमी अभिलेख कार्यालयात खोटी माहिती देऊन मोजणी करून घेतली. या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. हा दावा न्यायप्रविष्ट असताना देखील पुणे महानगरपालिकेच्या व हवेली भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आरोपींनी संगनमत करून मंत्रा 29 गोल्ड कोस्ट या स्किमचा प्लॅन पास करून घेतला.

Another Adarsh ​​scam in Pune, unauthorized project set up on ex-servicemen’s land

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात