विशेष प्रतिनिधी
नाशिक : Prasad Hire नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला Rolex replica मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील निवडणुकीचे राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलले असून महायुतीच्या गोटात समाधानाचे वातावरण आहे.Prasad Hire
तीन मंत्र्यांची बैठक ठरली निर्णायक
गेल्या काही दिवसांपासून प्रसाद हिरे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर मतविभाजनाचा धोका निर्माण झाला होता. ही बंडखोरी थांबवण्यासाठी महसूलमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी थेट पुढाकार घेतला.Prasad Hire
या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यामुळे replica Rolex watches गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला.
मालेगावच्या प्रश्नांवर मिळाले आश्वासन
प्रसाद हिरे यांनी सांगितले की, त्यांची लढाई वैयक्तिक नव्हती, तर मालेगाव आणि परिसरातील प्रलंबित प्रश्नांसाठी होती.
नार-पार प्रकल्प, वाहतूक व्यवस्था, काही गावांतील बोटींचा प्रश्न, वाढता कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा आणि स्थानिक विकासकामे याबाबत त्यांनी सरकारकडे मागण्या मांडल्या. या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्र्यांनी दिल्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांचे आभार मानले.
‘नाशिकचा प्रश्न सुटला, आता जळगावकडे लक्ष’
गिरीश महाजन यांनी या घडामोडीनंतर मोठा दावा केला. ते म्हणाले की, प्रसाद हिरे यांची माघार हा महायुतीसाठी replica Omega watches महत्त्वाचा टप्पा आहे.
“नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचाही प्रश्न सुटेल. महायुतीच्या सर्व जागा विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उर्वरित बंडखोरांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळ गितेंचे आव्हान कायम
प्रसाद हिरे यांनी माघार घेतली असली तरी नाशिकमधील राजकीय लढत पूर्णपणे एकतर्फी झालेली नाही. अपक्ष उमेदवार Gokul Gite अजूनही मैदानात आहेत.
महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्याशीही संपर्क साधल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांनी अद्याप माघार घेण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे निवडणुकीतील काहीसा सस्पेन्स कायम आहे.
नाशिकच्या जागेवरून आधीच मोठी रस्सीखेच
नाशिक विधान परिषद जागा महायुतीतील सर्वाधिक चर्चेची जागा ठरली होती. भाजपकडे संख्याबळ अधिक असल्याने ही जागा भाजपने मागितली होती. मात्र जागावाटपात अखेर ही जागा शिवसेनेकडे गेली आणि नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली. या निर्णयामुळे काही स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
याच नाराजीतून काही अपक्ष आणि बंडखोर उमेदवार मैदानात उतरल्याची चर्चा होती. त्यामुळे महायुतीला स्वतःच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती निर्माण झाली होती.
महायुतीसाठी दिलासादायक घडामोड
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती राज्यभरातील सर्व जागांवर विजय मिळवण्याचा दावा करत आहे. अशा वेळी नाशिकसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात बंडखोरी आटोक्यात आणण्यात यश मिळणे हा महायुतीसाठी मोठा राजकीय दिलासा मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App