विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला स्विस बॅँकेकडून याच महिन्यात भारतीयांच्या खात्यांची माहिती (अकाऊंट डिटेल्स) असलेली तिसरी यादी मिळणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकी हक्काच्या असलेल्या स्थावर मालमत्तेचाही समावेश असणार आहे. त्यामुळे काळ्या पैशांचा पर्दाफाश होणार आहे.The black money of Indians will be exposed, the government will get the third list from the Swiss bank
ऑटोमैटिक एक्सचेंज ऑ फ इन्फॉर्मेशन कराराअंतर्गत स्वित्झर्लंड सरकार स्विस बॅँकेकडून भारतीय खातेदारांची माहिती भारत सरकारला देणार आहे. काळ्या पैशाविरुध्द भारताच्या लढाईत हा एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी खरेदी केलेल्या फ्लॅट आणि इतर स्थावर मालमत्तेचीही माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर या संपत्तीवर कर लावणे शक्य होणार आहे.
आपली प्रतिमा सुधारण्यासाठी स्वित्झर्लंडने हे पाऊल उचलले आहे. स्विस बॅँक ही काळा पैसा लपविण्यासाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते. त्यामुळे स्वित्झर्लंडची प्रतिमा आंतरराष्टÑीय पातळीवर खराब होत आहे. स्वित्झर्लंड आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून पुढे येण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे स्विस बॅँकेला काळ्या पैशाची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
जगभर असले मानले जाते की अवैध संपत्तीची गुंतवणूक करण्यासाठी स्वित्झर्लंड हे नंदनवन मानले जाते. मात्र, स्वित्झर्लंड सरकारच्या या पावलामुळे सर्व गैरसमज दूर होणार आहेत. स्वित्झर्लंडमधील फॉर यू या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष हिमांशू यांनी या पावलाचे स्वागत केले आहे.
फॉर यू ही कंपनी स्वित्झर्लंडमध्ये स्टार्टअप्स आणि इतर कंपन्यांसाठी भारत आणि इतर देशांतून गुंतवणूक आणण्याचे काम करते. ते म्हणाले, आपल्या खातेदारांची माहिती लपविण्याचे स्विस बॅँकेला कोणतेही कारण नाही.
यापूर्वी स्वित्झर्लंडकडून भारतीय खातेदारांच्या माहितीची पहिली यादी सप्टेंबर २०१९ मध्ये मिळाली होती. भारताबरोबरच ७५ देशांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये दुसरी यादी मिळाली. गेल्या दोन वर्षांत स्विस बॅँकेने विविध देशांना ३० लाख खात्यांची माहिती दिली आहे. यावर्षी हा आकडा त्यापेक्षा जास्त असू शकतो.
स्विस बॅँकेने १८ जून २०२१ मध्ये जारी केलेल्या अहवालात म्हटले होते की भारतीयांची २० हजार ७०० कोटी रुपयांची संपत्ती बॅँकेत आहे. गेल्या तेरा वर्षांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. २०१९ च्या तुलनेत भारतीयांची संपत्ती २१२ टक्के किंवा ३.१२ पट वाढली आहे. २०१९ पर्यंत भारत आणि भारतीय कंपन्यांचे ६६२५ कोटी रुपयांचे डिपॉझिटस होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App