…होय भारत सोने की चिडीया! मोदी सरकारच्या काळात देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लागतोय नव्याने शोध

PM Modi new

आत्मनिर्भिर भारताच्या दिशेने वाटचाल सुरू; अन्य देशांवरील अवलंबित्व होणार कमी

विशेष प्रतिनिधी

पूर्वीकाळी भारताला सोने के चिडीया असं संबोधलं जायचं. भारतामधून सोन्याचा धूर निघत असे, असंही सांगितलं जायचं. याला कारण म्हणजे भारताला नैसर्गिरित्या लाभलेलं वरदान. इथल्या भूमीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे भरमसाठ साठे. अगदी संपूर्ण जगला हेवा वाटले अशी इथली समृध्दता होती. परंतु कालांतराने परकीय आक्रमणांमुळे भारताचं हे वैभव लुटलं गेलं. परंतु तरीही भारताची ही भूमी कायम समृद्ध असल्याचे दिसून आले आहे.Bharat is gold bird During the Modi government the countrys natural resources are being rediscovered

असे सांगण्याचे कारण म्हणजे अजूनही या भूमीत विविध ठिकाणी मोठ्याप्रमाणावर नैसर्गिकसाधन संपत्ती, धातू, खनिजे आणि अगदी सोन्याचेही भरमसाठ साठे आढळून येत आहेत. आपल्या या वैभवाचा इतकी वर्षे त्या दृष्टीने शोध घेतला गेला नाही म्हणा किंवा तसा आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने विचारही केला गेला नाही. परंतु आता मोदी सरकारच्या काळात भारताला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होताना दिसत आहे. याची काही उदाहरणे पाहूयात.


घातसूत्र : भारतातल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पुढे सरसावली ब्रिटन मधली लेबर पार्टी!!


बिहारमध्ये आढळला सोन्याचा सर्वात मोठा साठा –

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)नुसार, बिहारमधील जमुई जिल्ह्यात सुमारे २२२.८८ दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. ज्यामध्ये ३७.६ टन खनिज-समृद्ध धातूचा समावेश आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत एकट्या बिहारमध्ये ४४ टक्के सोने असल्याचे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात उघड झाले होते. २०२२ मध्ये बिहारमधील हा सोन्याचा साठा उघड झाला होता.

राजस्थानमध्ये युरेनियमचे साठे –

राजस्थानमध्ये मागील वर्षी युरेनियमचे साठे सापडले आहेत. त्यानंतर सीकर जिल्ह्यातील खंडेला येथे १०८६.४६ हेक्टर क्षेत्रात १२ दशलक्ष टन युरेनियम आणि त्याच्याशी संबंधित इतर खनिजांच्या उत्खनन सुरू झाले आहे. यामुळे राज्यात गुंतवणुकीत वाढ होण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. आंध्र प्रदेश तुमरपल्ली आणि झारखंडमध्ये देशातील सर्वात जास्त युरेनियमचा साठा आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचे साठे –

जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले आहेत. त्याची क्षमता ५९ लाख टन आहे. त्याला ‘व्हाइट गोल्ड’ असेही म्हणतात. भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा जगातील तिसरा सर्वात मोठा लिथियमचा साठा असू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम मिळाल्यामुळे भारताचे नॉन-फेरस धातूंवरील अवलंबित्व इतर देशांवरून कमी होण्याची अपेक्षा आहे.

 

ओडिशामध्ये आढळले सोन्याच्या खाणी –

ओडिशाच्या तीन जिल्ह्यामधील विविध ठिकाणी सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत. पोलाद आणि खाण मंत्री प्रफुल्ल मल्लिक यांनी राज्य विधानसभेत याची माहिती दिली. देवगड, केओंझार आणि मयूरभंजसह ओडिशातील तीन जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत. राज्य खाण आणि भूविज्ञान संचालनालय आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांनी प्राथमिक सर्वेक्षण केले आणि देवगड, गोपूर, गाझीपूर, कुसाकला, अडाल, सालिकाना, दिमिरमुंडा आणि अडास परिसरात सोन्याचे साठे असल्याचे आढळून आले आहे.

Bharat is gold bird During the Modi government the countrys natural resources are being rediscovered

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात