मोदी का परिवारची राहुलने मारली “कॉपी”; म्हणाले, वायनाडच्या प्रत्येक घरात राहतात माझे आई-वडील आणि बहिणी!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पर्यावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच मोदींनी संपूर्ण देशभर “मोदी का परिवार” ही चळवळ सोशल मीडियात उभी केली. भाजप कार्यकर्त्यांनी ती प्रचंड उचलून धरली. त्यामुळे सगळीकडे “मोदी का परिवार” याचा प्रचार जोरदार झाला. My parents and sisters live in every house in Wayanad! says rahul gandhi

पण ज्या काँग्रेस नेत्यांनी मोदींना डिवचण्यासाठी त्यांच्या परिवाराचा मुद्दा उपस्थित केला होता, त्या काँग्रेसच्या मुख्य नेत्यालाच “मोदी का परिवारा”ची वेगळ्या प्रकारे कॉपी करावी लागली. केरळच्या वायनाडमध्ये बोलताना राहुल गांधींनी मोदींच्या परिवाराची कॉपी मारली. वायनाड मध्ये मतदारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी वायनाडच्या लोकांना मतदार म्हणून वागणूक देतच नाही. कारण वायनाडचे सगळे लोक माझे बंधू – भगिनी आहेत. वायनाडच्या प्रत्येक घरात माझे आई-वडील आणि बहिणी राहतात. माझी बहीण प्रियांका हिच्यावर जसे मी एक भाऊ म्हणून प्रेम करतो तसेच मी तुम्हा सगळ्यांवर करतो. वायनाडच्या माझ्या सगळ्या आई-वडील आणि बहिणींवर माझे प्रेम आहे, असा निर्वाळा राहुल गांधींनी दिला.

केरळ मधला वायनाड हा असा मतदार संघ आहे, जिथे देशातले अल्पसंख्यांक बहुसंख्यांक आहेत म्हणजे तिथे मुस्लिम लोकसंख्या हिंदू लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. 2019 मध्ये अमेठीतून पराभवाची भीती वाटल्यामुळे राहुल गांधींनी त्याच वर्षी वायनाड मधून देखील उमेदवारी दाखल केली होती. राहुल गांधींनी बांधलेल्या अटकळीनुसार त्यांचा अमेठीतून खरंच पराभव झाला, पण वायनाडने मात्र त्यांना निवडून दिले. त्यामुळे ते लोकसभेत खासदार म्हणून 5 वर्षे काम करू शकले.

आता देखील राहुल गांधींनी वायनाड मधूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो अर्ज दाखल करतानाच राहुल गांधींनी वायनाड मधल्या प्रत्येक घरात आपले आई-वडील आणि बहिणी राहतात, अशी घोषणा करून टाकली, पण हे सगळे करताना आपण मोदी का परिवार याची कॉपी मारल्याचे मात्र ते विसरले.

My parents and sisters live in every house in Wayanad! says rahul gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात