कॅन्सरशी झुंज देत असलेले भाजप नेते सुशील मोदी म्हणाले- ‘आता मी लोकसभा निवडणुकीत..’


इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही केली आहे विशेष पोस्ट

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट लिहून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपण कॅन्सरसारख्या घातक आजाराने ग्रस्त असून, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी लिहिले आहे. BJP leader Sushil Modi who is battling with cancer said Now I am in the Lok Sabha elections

सुशील मोदी यांनी भावनिक पोस्ट लिहिताना सांगितले की, गेल्या ६ महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत आहेत. आता मला वाटले की लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. सर्व काही पंतप्रधान मोदींना सांगितले आहे. सदैव कृतज्ञ आणि देश, बिहार आणि पक्षासाठी समर्पित.

इंडिया आघाडीने आपल्या ट्वीटर हॅण्डलरवर पोस्ट करत म्हटले की, राजकारण आपल्या जागी परंतु आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हावेत.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. लोक आपापल्या परीने सुशील मोदींच्या लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत. वरुण राज नावाच्या युजरने सांगितले की, सर तुम्ही योद्धा आहात… तुम्ही कॅन्सरवरही विजय मिळवाल. विपिन मिश्रा नावाच्या युजरने लिहिले की, ऐकून खूप दुःख झाले.. राजकारणातून ब्रेक घ्या आणि योग्य उपचार घ्या. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. लवकरात लवकर बरे व्हावे ही सदिच्छा.

BJP leader Sushil Modi who is battling with cancer said Now I am in the Lok Sabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात