साताऱ्याच्या तिढ्यात, पृथ्वीराज चव्हाण अडकायला तयार नाहीत पवारांच्या जाळ्यात!!


नाशिक : साताऱ्याच्या तिढ्यात, पृथ्वीराज चव्हाण अडकायला तयार नाहीत पवारांच्या जाळ्यात!!, असेच चित्र कायम आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात लढायला शरद पवारांना “तगडा” उमेदवार सापडायला तयार नाही म्हणून पवारांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांनाच गळ घातली. शरद पवार जर 83 व्या वर्षी लढू शकतात तर तुम्हीही त्यांना या वयात साथ देऊ शकता, असे सांगून पवारांच्या समर्थकांनी श्रीनिवास पाटलांना उमेदवारी घेण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीनिवास पाटील बधले नाहीत. Prithviraj chavan refused to be trapped into sharad pawar’s net for satara loksabha candidataure

त्यामुळेच पवारांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच गळ्यात उमेदवारी घालावी असे वाटल्यास नवल नाही. पण 2024 चा सातारा म्हणजे 2019 चा सातारा नव्हे!! 2019 ते 2024 ही वेगवेगळी वर्षे आहेत दरम्यानच्या पाच वर्षांमध्ये कृष्णा कोयना संघातून बरेच “राजकीय पाणी” वाहून गेले आहे. त्यावेळी 2019 मध्ये ऐन टायमाला पाऊस पडला म्हणजे पुन्हा पाऊस पडेलच याची कुठलीही गॅरेंटी नाही!! “त्यावेळी” पवारांनी “तशी” तयारी केली तरी, “यावेळी” उदयनराजे त्यापेक्षा “अधिक चांगली” तयारी करून मैदानात उतरतील, हे पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला समजत नाही, असे बिलकुल नाही. म्हणूनच पवार सावधगिरीचा पवित्रा दाखवून आपल्या हातातली सीट स्वतःहून पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात घालायला तयार झाले.

पण ज्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना पवारांनी सही करायला हाताला लकवा मारलाय का??, असा सवाल करून हिणवले होते, ते हिणवणे पृथ्वीराज चव्हाण कसे विसरतील?? पवार जर अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायले असतील, तर पृथ्वीराज चव्हाणही काही कमी नाहीत. ते तर दिल्लीचे आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणचे राजकारण कोळून प्यायलेत!! त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण पवारांच्या जाळ्यात अडकायला तयार नाहीत. 

पवारांनी त्यांच्यावर साताऱ्याच्या उमेदवारीचा गुगली टाकल्याबरोबर त्यांनी त्या गुगली वर जो षटकार हाणला, त्यावर पवार अजून निर्णय घ्यायला तयार नाहीत. कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना सातारा लढायचा असेल, तर तुमच्या तुतारीवर नव्हे, तर काँग्रेसच्या हाताच्या पंजावर लढवेन, असे सांगितले. त्यामुळे सातारा मतदारसंघावर काँग्रेसचा कायमचा दावा निर्माण होऊ शकेल. मग आत्तापर्यंत पवारांनी उभे केलेले सगळेच मुसळ केरात जाईल, हे पवारांना न समजायला ते काही राजकीय दुधखुळे नाहीत. त्यामुळे पवार अजूनही निर्णय घ्यायला तयार नाहीत. साताऱ्याच्या उमेदवारीच्या तिढ्याचे हे खरे “राजकीय इंगित” आहे!!

पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्याचा तपशीलवार खुलासास करून टाकला. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत अनावश्यक “स्पेक्युलेशन” करण्याची गरज नाही. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेटले होते. पण आम्ही दोघांनी साताऱ्यासह सांगली आणि अन्य मतदारसंघांबाबत तसेच महाराष्ट्रातल्या एकूण परिस्थिती बाबत चर्चा केली होती. ही सगळी चर्चा मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे. माझ्या व्यक्तिगत भावना मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आणि शरद पवारांनाही कळवल्या आहेत. शरद पवार काय असेल तो योग्य निर्णय घेतील आणि त्यांचा “बळकट” उमेदवार देतील त्याबद्दल जास्त “स्पेक्युलेशन” करण्याचे कारण नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगून टाकले.

यातून पृथ्वीराज चव्हाण यांची खरी मुत्सद्देगिरी दिसली. पवारांच्या नादी लागून सातारा लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हावर उभे राहायचे म्हणजे स्वपक्ष म्हणजेच काँग्रेस सोडून द्यायचा आणि पवारांच्या भरवशावर सातारा लोकसभा निवडणूक लढवायची म्हणजे त्याचा निकाल काय लागेल??, हे सांगायला फार मोठ्या भविष्यवेत्याची गरज नाही. त्यामुळे एकदा “पवारांचा अनुभव” घेऊन बसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी सातारा लोकसभा मतदारसंघात पवारांच्या भरवशावर आणि त्यांच्या तुतारी चिन्हावर लढवायला नकार देऊन पवारांच्या जाळ्यात अडकला तयार नसल्याचे दाखवून दिले.

Prithviraj chavan refused to be trapped into sharad pawar’s net for satara loksabha candidataure

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात