CJP : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे मुसलमानांनी फिरवली पाठ, म्हणून ते झाले फ्लॉप!!, हेच राजकीय वास्तव या आंदोलनाच्या निमित्ताने समोर आले.
अभिजीत दिपके याने कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन खूप मोठे करायचा प्रयत्न केला. त्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद जरूर मिळाला पण प्रत्यक्षात जंतर-मंतरवर त्याची गर्दीमध्ये झलक दिसली नाही. अभिजीत दिपकेला तरुणाईचा प्रतिसाद मिळाला अगदी सगळ्या राज्यांमधून लिबरल जमातीचे लोक त्या आंदोलनासाठी दिल्लीत गेले. त्यामुळे जंतर-मंतरवर जमलेली गर्दी दिसली.
पण आधीची जंतर-मंतरवरची आणि शाहीन बाग मधली आंदोलने आणि अभिजीत दिपके याचे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन यात फार मोठी तफावत दिसली, ती म्हणजे आधीच्या आंदोलनांमध्ये मुस्लिमांचा प्रचंड सहभाग होता पण अभिजीत दिपके याच्या कॉपरोच जनता पार्टीच्या आंदोलनात मुस्लिमांचा सहभाग घेतला नाही किंबहुना मुस्लिमांनी जाणीवपूर्वक त्या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे आढळून आले.
– Stay Away campaign
कारण दिल्लीतल्या मुसलमान समुदायाने सोशल मीडियावरून आंदोलनात सहभागी होऊ नये असे कॅम्पेनच चालविले होते. त्या आंदोलनात सहभागी झालात आणि तिथे हिंसाचार झाला तर त्याचा कायदेशीर दुष्परिणाम मुसलमानांनाच भोगाव लागेल सरकार आणि समाजाच्या संतापाला बळी पडावे लागेल त्यापेक्षा त्या आंदोलनापासून दूरच राहा, अशा सूचना वेगवेगळ्या मशिदींच्या धर्मगुरूंनी प्रार्थना सभांमधून दिल्या होत्या. त्याचबरोबर Stay Away म्हणजे दूर राहा हे कॅम्पेन चालविले होते. त्याचाच परिणाम मुस्लिम विद्यार्थ्यांवर झाला आणि दिल्ली आणि परिसरातले मुस्लिम विद्यार्थी अभिजीत दीपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील झाले नव्हते.
– दुसरी शाहीन बाग घडली नाही कारण…
शाहीन बाग आणि जंतर-मंतरवरच्या आधीच्या आंदोलनांमध्ये मुसलमानांनी चढाई करून भाग घेतला होता. त्यामुळे लिबरल लोक प्रचंड आनंदित झाले होते. मुसलमान ज्या अर्थी आपल्यात सहभागी झालेत त्याचे आपले आंदोलन यशस्वी होईल, अशी त्यांना त्यावेळी खात्री वाटत होती. किंबहुना आपले आंदोलन सर्वसमावेशक असल्याचा आव सुद्धा लिबरल लोकांनी त्यावेळी आणला होता. विरोधी पक्षांना तर त्या आंदोलनांनी आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. आंदोलनांच्या निमित्ताने मोदी सरकारला खाली खेचून देशात अराजक माजवून सत्ता काबीज करण्याचा त्यांचा डाव होता.
– मुसलमान का दूर राहिले??
पण तो डाव वेगवेगळ्या पातळ्यांवर कारवाया करून उधळण्यात आला. त्या आंदोलनांचा परिणाम म्हणून अनेकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. बुलडोझर कारवाया हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग ठरला. आधीच राजकीय दृष्ट्या सजग असलेला मुसलमान समाज सावध झाला. लिबरल लोकांच्या आंदोलनात सामील होऊन मुसलमान बदनाम होतात, अशी त्यांची धारणा झाली. त्यामुळेच अभिजीत दिपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापासून अंतर राखायचा निर्णय झाला आणि मुसलमान समाजातल्या धार्मिक आणि सामाजिक नेत्यांनी मुस्लिम तरुणांना कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापासून अंतर ठेवायला भाग पाडले. हे राजकीय सत्य टाइम्स ऑफ इंडिया सारख्या लिबरल माध्यमाने वेगळ्या भाषेत पण जाहीरपणे सांगितले.
– लिबरल लोकांसाठी धडा, पण…
कॉक्रोज जनता पार्टीचे कालचे आंदोलन हा लिबरल लोकांच्या राजकीय आणि सामाजिक अपयशाचा देखील नमुना ठरला. कारण मुसलमानांचे तुष्टीकरण करून सुद्धा आपल्याबरोबर येत नाहीत याचा धडा लिबरल लोकांना मिळाला पण यातून लिबरल लोक काही शिकतीलच, याची कुठली गॅरंटी नाही. कारण जुन्या चुकांमधून शिकायचे नाही आणि नवीन चुका केल्याशिवाय राहायचे नाही हा लिबरल लोकांचा आवडता छंद आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App