आयएसआयचा उल्लेख आणि बॉम्बस्फोटाचा दिला आहे इशारा Modi
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Modi पोलिसांना शनिवारी धमकीचा मेसेज आला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा दावा करण्यात आला आहे. हा संदेश राजस्थानमधील अजमेर येथील नोंदणीकृत क्रमांकावरून आला आहे. यामध्ये संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने रवाना करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी सकाळी ट्रॅफिक पोलिस हेल्पलाइनवर पाठवलेल्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये दोन आयएसआय एजंट्सनी मोदींना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवण्याच्या योजनेचा उल्लेख केला होता. Modi
Farmer : शेतकरी नेते म्हणाले- केंद्राने चर्चा करावी, अन्यथा 8 डिसेंबरला दिल्लीत धडकू
तपासकर्त्यांच्या मते, हा मेसेज पाठवणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा दारूच्या प्रभावाखाली असू शकते. मात्र, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर यापूर्वीही अनेक बनावट धमकीचे संदेश आले आहेत.
गेल्या दहा दिवसांत मुंबई वाहतूक पोलिसांना अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारे दोन मेसेज आले आहेत. शुक्रवारी पाठवलेल्या नवीन संदेशात म्हटले आहे की, “सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने राजस्थानमधील बिश्नोई समुदायाच्या मंदिरात जाऊन समाजाची माफी मागावी किंवा ५ कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही तर आम्ही त्याला संपवू. या प्रकरणात बिष्णोई टोळी अजूनही सक्रिय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App