सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस खोटी आश्वासने देत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. Anurag Thakur
विशेष प्रतिनिधी
शिमला : हमीरपूरचे खासदार आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) नेते अनुराग ठाकूर यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारला स्वातंत्र्यानंतर राज्यातील “सर्वात अक्षम आणि भ्रष्ट सरकार” म्हणून संबोधले. सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस खोटी आश्वासने देत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
येथील भाजपच्या ‘आक्रोश रॅली’ला संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांच्या सरकारने मागील भाजप सरकारने सुरू केलेले प्रकल्प बंद पाडल्याचा आरोप केला. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी “खोटी आश्वासने” देऊन जनतेची “फसवणूक” केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
Farmer : शेतकरी नेते म्हणाले- केंद्राने चर्चा करावी, अन्यथा 8 डिसेंबरला दिल्लीत धडकू
ठाकूर म्हणाले, “18 ते 59 वयोगटातील महिलांना 1500 रुपये आणि पाच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन विसरा कारण सरकारी नोकऱ्यांमध्येही लोकांना वेळेवर पगार आणि पेन्शन दिले जात नाही. कोविड काळात भरती झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही दार दाखविण्यात आले आणि ‘इंटर्नशिप’ करणाऱ्यांना त्यांच्या पगारासाठी चार महिने वाट पाहावी लागली, असा आरोप त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App