EVMs : विरोधकांना दिसत नाहीत सरकार मधल्या फटी, म्हणून राहुल + पवार गाठणार मारकडवाडी!!

EVM

नाशिक : EVMs विरोधात रडून झाले, संभल जामा मशिदीच्या सर्वेक्षणाव वरून चिडून झाले, पण विरोधकांना दिसल्या नाहीत सरकार मधल्या फटी, म्हणून राहुल + पवार गाठणार मारकडवाडी!!, असला प्रकार सुरू झालाय.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जोशात आलेले विरोधक हरियाणा आणि महाराष्ट्राल्या पराभवानंतर जे ढेपाळलेत, ते अजून सावरायला तयार नाहीत. म्हणून ते सरकार विरोधात खरे मुद्दे शोधत आहेत, पण ते हाताला काही लागत नाहीत. विरोधकांना सरकार मधल्या फटी दिसतच नाहीत. म्हणून मग मारकडवाडी गाठायची पाळी राहुल गांधी आणि शरद पवारांवर आली आहे.

वास्तविक EVMs विरोधातली रडा रड आणि बॅलेट पेपर वरची निवडणूक हे खरे मुद्देच नाहीत. त्या मुद्द्यामधली हवा प्रत्येक निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने निघून गेली आहे. हे मुद्दे ना जनतेसाठी महत्त्वाचे आहेत, ना विरोधी पक्षांसाठी उपयोगी पडणार आहेत. विरोधकांचा मोठा प्रॉब्लेम हा आहे की, शरद पवारांसारखे ज्येष्ठ जाणते आणि बुजुर्ग नेते त्यांच्या गोटात असून देखील त्यांना सरकार विरोधात लढण्यासाठी बळकट मुद्देच मिळत नाहीयेत. कारण खुद्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या जनतेने असा काही दणका दिला आहे की, शरद पवार महाराष्ट्रभर फिरले तरी त्यांची राष्ट्रवादी आता पुन्हा उठून उभी राहण्याची शक्यता नाही. उलट त्यांच्या राष्ट्रवादीला मोठी गळती मात्र लागायची दाट शक्यता आहे.

वास्तविक देशातले सगळ्यांत मोठे राजकीय हवामानतज्ञ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना गौरविले होते. मग एवढ्या मोठ्या राजकीय हवामानतज्ञाचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अंदाज चुकलाच कसा??, आपला तुतारीचा पक्ष मशालीसकट एवढा गाळात गेलाच कसा??, हेच या राजकीय हवामानतज्ञांना समजेनासे झालेय म्हणून मग मारकडवाडी सारखी बॅलेट पेपर निवडणूक नौटंकी करायची वेळ त्यांच्यावर आलीय.

असली नौटंकी करताना पवारांच्या हे लक्षात कसे येत नाही की, त्यांची राहुल गांधींच्या मागे फरफट चालू आहे, जे पवारांच्या राजकीय प्रतिष्ठेस बिलकूल शोभनीय नाही. पवारांना महाराष्ट्राच्या जनतेची नाडी चांगली समजते, असेही म्हणतात. त्यांचा गेल्या 60 वर्षांच्या राजकारणाचा अनुभव त्याची पुष्टी करतो. पण मग 2024 च्या निवडणुकीत मात्र पवारांच्या हातातून महाराष्ट्राची नाडी निसटली, की पवारांचे नाडी ओळखण्याचे राजकीय वैद्यकीय ज्ञानच कमी पडले?? म्हणूनही मारकडवाडी नौटंकी करायची वेळ त्यांच्यावर आली आहे??

बाकी महात्मा गांधींची दांडी यात्रा आणि मारकडवाडीची बॅलेट पेपर यात्रा यांची तुलना करून जितेंद्र आव्हाडांनी आपले मार्केटिंग मात्र मध्ये करून घेतले, तर सगळ्या विरोधी आमदारांनी आज विधिमंडळात जाऊन देखील शपथा न घेऊन स्वतःचे मार्केटिंग केले.

EVM Rahul gandhi and Sharad pawar joint markadwadi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात