दिल्ली उत्पादन शुल्क  प्रकरणात ‘ED’ने मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी कविता यांना पाठवले समन्स!


गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याच प्रकरणात सीबीआयने केली होती चौकशी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बीआरएस नेत्या कविता यांना उद्या (शुक्रवारी,१५ सप्टेंबर) समन्स बजावले आहे, अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. तेलंगणा विधान परिषदेच्या सदस्या के कविता यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याच प्रकरणात चौकशी केली होती. ED summons Chief Minister KCRs daughter Kavita in Delhi Excise Duty case

ईडीने आरोप केला आहे की कविता ‘आप’चे कम्युनिकेशन प्रभारी विजय नायर यांच्या संपर्कात होत्या, ज्यांनी धोरण तयार करताना आणि अंमलबजावणीच्या वेळी मद्य व्यावसायिक आणि राजकारण्यांची भेट घेतली होती. विजय नायर यांनी साऊथ ग्रुप नावाच्या ग्रुपकडून किमान 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचे ईडीने म्हटले आहे. विजय नायरला गेल्या वर्षी सीबीआयने अटक केली होती.

ईडीने यापूर्वी मार्च महिन्यात  कविता यांची चौकशी केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित घोटाळ्यात रोखीच्या व्यवहारात सहभागी असलेल्या डझनहून अधिक लोकांनाही समन्स बजावण्यात आले आहे.

ED summons Chief Minister KCRs daughter Kavita in Delhi Excise Duty case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात