याआधी मंगळवारी कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र लोकांनी आदिवासी समाजातील तीन जणांची हत्या केली होती.
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. चुराचंदपूर जिल्ह्यातील चिंगफेई येथे बुधवारी सशस्त्र हल्लेखोरांनी एका पोलीस उपनिरीक्षकाची (एसआय) हत्या केली. गोळीबारात दोन ग्राम संरक्षण स्वयंसेवक (व्हीडीव्ही) देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली असून, ओन्खोमांग असे हत्या झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. Sub inspector shot dead two injured by armed assailants in Manipur
उपनिरीक्षक ओन्खोमांग यांच्या डोक्यात गोळी लागली. त्यांना तत्काळ चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तर गोळीबारात जखमी झालेल्या दोन व्हीडीव्हींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक आपल्या ड्युटीनंतर चिंगफेई गावात व्हीडीव्हींशी बोलत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी अतिरिक्त पोलिस दलासह परिसरात पोहोचले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
याआधी मंगळवारी कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र लोकांनी आदिवासी समाजातील तीन जणांची हत्या केली होती. कांगगुई परिसरात असलेल्या इरेंग आणि करम वाफेई गावांदरम्यान हल्ला करण्यात आला. अधिकार्यांनी सांगितले की, तिघांनी कांगपोकपी जिल्ह्यातील पोनलेन येथून प्रवास सुरू केला होता आणि पर्वतीय रस्त्याचा वापर करून लेमाकॉन्गच्या दिशेने जात असताना सिंगाडा धरणाजवळील इरेंग येथे सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांना थांबवले आणि गोळीबार केला. हल्लेखोरांनी स्वयंचलित शस्त्रे वापरल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more