उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त

Arrest new

सीबीआयने सापळा रचून अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ  पकडले आहे.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : सीबीआयने केसी जोशी नावाच्या रेल्वे अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात अटक केली असून त्याच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. अधिकारी गोरखपूरमध्ये नियुक्तीवर होते. अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता घरातून तब्बल २.६१ कोटी रुपये जप्त करण्यात आले. Uttar Pradesh CBI arrests bribe taking railway officer  lots of currency notes found in house crores of rupees seized

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने ईशान्य रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक के.सी. जोशी यांना  लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. झडतीदरम्यान त्याच्या घरातून २.६१ कोटी रुपये (अंदाजे) रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल ईशान्य रेल्वे गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक यांना सीबीआयने अटक केली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने सापळा रचून अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ  पकडले आहे.

Uttar Pradesh CBI arrests bribe taking railway officer  lots of currency notes found in house crores of rupees seized

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात