राजस्थानमध्ये काँग्रेसला घरचा आहेर! आमदाराने मुंडन करत मु्ख्यमंत्री गेहलोत यांना पत्राद्वारे सुनावले


जाणून घ्या, पत्रातून आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी नेमकं काय म्हटलं आहे.

विशेष प्रतनिधी

कोटा : राजस्थानमधील काँग्रेस सरकारमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा दिसून आला आहे. काँग्रेस आमदाराने  मुख्यमंत्री  अशोक गेहलोत यांच्याविरोधात जाहीरपणे आक्रमक भूमिका घेतली आहे . नुकतेच कोटा येथे काँग्रेस आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी मुंडन करून संपूर्ण राजस्थानचे लक्ष वेधले आहे. इतकंच नाही तर त्यांनी अशोक गेहलोत यांना पत्र लिहून खाण मंत्री प्रमोद जैन भाया यांच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिल्याबद्दल आणि ‘खान की झोपडिया’ गावाचा कोटा जिल्ह्यात समावेश न केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. In Rajasthan Congress MLA Bharat Singh Kundanpur criticized Chief Minister Ashok Gehlot

कोटा चंबल रिव्हरफ्रंटचे आज उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित नव्हते. याआधीही सांगोदचे आमदार आणि माजी मंत्री भरत सिंह यांनी त्यांच्या विरोधाची घोषणा केली होती. मंगळवारी त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी पत्रात लिहिले आहे की, कोटा येथील रिव्हर फ्रंटच्या उद्घाटनाबद्दल माझ्याकडून तुमचे हार्दिक अभिनंदन. कोटा येथे तुमच्या स्वागत करण्याच्या ठिकाणी, मी माझ्या निवासस्थानी सांगोद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह गृहमंत्री मुर्दाबादच्या घोषणा देण्याचे घोषित केले आहे . ‘भाया’च्या भ्रष्टाचाराला उघड समर्थन कुठून मिळाले आणि कोटा जिल्ह्यातील ‘खान की झोपडिया’ गावाचा समावेश न केल्याबद्दल तुमच्या ठरावाबद्दल मी खेद व्यक्त करतो.

आमदार भरत सिंह यांनी पत्रात पुढे लिहिले की, हे गांधीवादी अशोक गेहलोत यांना शोभत नाही, तुमचा आत्मसन्मान मेला आहे. तुमचा आत्मसन्मान मेल्याने मी मुंडन करून माझे केस तुम्हाला भेट करतो आहे.  कृपया या तुच्छ भेटीचा स्वीकार करा आणि महात्मा गांधींचे स्मरण करून त्यांनी सांगितलेल्या सात पापांचे चिंतन करावे, मुख्यमंत्री हे पद कायमस्वरूपी नाही.

In Rajasthan Congress MLA Bharat Singh Kundanpur criticized Chief Minister Ashok Gehlot

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात