‘I.N.D.I.A’ आघाडीमधील मतभेद पुन्हा उघड!, हरियाणात आम आदमी पार्टीचा ‘एकला चलो रे’चा नारा

Aam Aadmi Party's CM candidate for Punjab will be from the Sikh community says arvind kejriwal

विशेष प्रतिनिधी

हरियाणा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी ‘I.N.D.I.A’ आघाडी तयार केली आहे. मात्र या आघाडीमधील अंतर्गत मतभेद वारंवार उघडकीस येत आहेत.  विशेष करून आम आदमी पार्टीकडून ज्याप्रकारे निर्णय  जाहीर केले जात आहेत, त्यावरून हे प्रकर्षाने जाणवत आहे. Disagreement in  INDIA alliance, Aam Aadmi Party will contest elections on its own in Haryana

आता आम आदमी पार्टीने हरियाणा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  ‘आप’चे सरचिटणीस संदीप पाठक यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा निवडणुकीत एकटाच  लढणार आहे आणि कोणत्याही पक्षासोबत जागा वाटून घेणार नाही.

संदीप पाठक म्हणाले, हरियाणात विधानसभा निवडणुका येणार आहेत आणि आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही सर्व राज्यांमध्ये संघटना स्थापन करत आहोत. हरियाणामध्ये मंडळ स्तरापर्यंत आमची संघटना स्थापन झाली आहे. सुमारे १५ दिवसांत हरियाणातील प्रत्येक गावात आमच्या सर्व समित्या तयार केल्या जातील आणि त्यानंतर आम्ही आमची मोहीम सुरू करू. हरियाणातील लोक बदलासाठी उत्सुक आहेत. हरियाणात आम्ही चांगली कामगिरी करू. विधानसभा निवडणूक सर्व जागांवर नक्कीच लढवली जाईल.

Disagreement in  INDIA alliance, Aam Aadmi Party will contest elections on its own in Haryana

महत्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!