हिंदू धर्म नष्ट करणारे नष्ट होतील, हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही – देवेंद्र फडणवीस


मविआ सरकारच्या मुख्य राज्यकर्त्याला माझा थेट प्रश्न आहे की, जर हनुमान चालीसा भारतात म्हणणार नाही तर काय पाकिस्तानात म्हणणार का? असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

अमरावती : हिंदू धर्म नष्ट करणारे नष्ट होतील, हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही,  असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  युवा स्वाभिमान पक्षातर्फे व खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या, बडनेरा (अमरावती), भाजपा युवा मोर्चा (मध्य आणि पश्चिम नागपूर), सदभावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ (गरोबा मैदान, नागपूर), आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल (नंदनवन, नागपूर) भव्य दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.  अमरावती येथे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राजपाल यादव आणि हजारो भक्तांसह हनुमान चालिसाचे पठण केले व प्रतिकात्मक पद्धतीने अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली गेली. Those who try to destroy Hinduism will destroy themselves but Hinduism will never be destroyed Devendra Fadnavis

याप्रसंगी फडणवीस म्हणाले, मागील 9 वर्षांत केंद्रातील मोदी सरकार व राज्यात महायुती सरकारने अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. आज अमरावती जिल्ह्याला क्रीडा विद्यापीठ, मराठी भाषा विद्यापीठ, मेडीकल कॉलेज, एअरपोर्ट, टेक्सटाइल पार्क दिले आहे. या टेक्सटाइल पार्कमुळे अमरावती जिल्ह्यातील 3 लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यामध्ये रस्ते बांधणीसाठी  2000 कोटीचा निधी देण्यात आला आहे.

याचबरोबर या सरकारने अमरावती येथील छत्री तलाव, ऋणमोचन, संत गाडगेबाबा महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींना हनुमान चालीसाचे पठण केल्याने तुरुंगात पाठविण्यात आले होते. मविआ सरकारच्या मुख्य राज्यकर्त्याला माझा थेट प्रश्न आहे की, जर हनुमान चालीसा भारतात म्हणणार नाही तर काय पाकिस्तानात म्हणणार का? आणि तो दिवस देखील दूर नाही जेव्हा आम्ही पाकिस्तानातही हनुमान चालीसाचे पठण करु. असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

याशिवाय मुंबईत उद्धव ठाकरे ज्यांच्यासोबत बसले होते, त्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा ज्युनियर स्टॅलिन हिंदू धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करत हिंदू धर्म संपवण्याची भाषा करत आहे. अरे नादान स्टॅलिन, हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परकीय आक्रमकांचा नायनाट झाला. हिंदू धर्माबद्दल वाईट बोलणार्‍या लोकांना त्यांची जागा दाखवणे फार महत्वाचे आहे. भगवान श्रीकृष्णाने भेदभावमुक्त समाजाचा संदेश दिला. हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असं फडणवीस म्हणाले आहेत.

Those who try to destroy Hinduism will destroy themselves but Hinduism will never be destroyed Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात