मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के होणार वाढ


दर तीन वर्षांनी टोलची पुनरावृत्ती होत असते

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  मुंबईच्या पाच एंट्री पॉईंट्सवरील टोलच्या दरात १ ऑक्टोबरपासून १२.५ ते १८.७५ टक्के वाढ होणार आहे.  दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे मुंबईचे पाच एंट्री पॉईंट्स  आहेत. Toll at five entry points of Mumbai will increase from 12.5 to 18.75 percent from October 1

सुधारित दरानुसार  मिनी बससाठीच्या टोलच्या दरात १० रुपयांनी वाढ होणार आहे, सध्या मिनी बससाठी ६५ ते ७५ रुपये टोल आकारला जातो.  तर प्रवासी  कार, हलकी मोटार वाहनांच्या  एकेरी टोल दरात ५ रुपयांची वाढ  होईल. याशिवाय ट्रक आणि बससारख्या अवजड वाहनांना आता १५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये आकारले जाणार आहेत.

सप्टेंबर २००२ पासून मुंबईच्या या एंट्री पॉईंट्सवर टोल आकारला जात असून आता हे शुल्क नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू असणार आहे. दर तीन वर्षांनी टोलची पुनरावृत्ती होत असते, या अगोदर १ ऑक्टबर २०२० रोजी ती झाली होती, त्यामुळे आता पुन्हा १ ऑक्टोबर रोजी पुनरावृत्ती होत आहे. तर पुढे १ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल.

Toll at five entry points of Mumbai will increase from 12.5 to 18.75 percent from October 1

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात