उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होतीच. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरसकट 200 रुपयांची सवलत दिली, तर उज्ज्वला योजनेतर्गंत 400 रुपयांची सवलत मिळाली. Free gas connection to 75 lakh women under Ujjwala Yojana

केंद्र सरकारने आता देशातील तब्बल 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. पुढील तीन आर्थिक वर्षांत ही गॅस सिलेंडरची जोडणी करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत या महिलांना लाभ मिळणार आहे.

1,650 कोटींचा तिजोरीवर भार

मंत्रीमंडळाने आज पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत हे नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत या गॅस कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहेत. 75 लाख एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहेत. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटींचा बोजा पडणार आहे. निवडणुकीचा हंगाम लवकरच सुरु होत आहे. चार राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत, तर पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ही सरबराई करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पण प्रत्यक्षात काँग्रेस शासित राज्य सरकारांनी 500 रुपयात सिलेंडरची घोषणा केलीच आहे.9.60 कोटी गॅस कनेक्शन

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी या घडामोडींची माहिती दिली. त्यानुसार जगभरातील संस्थांनी केंद्रांच्या उज्ज्वला योजनेचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात मोठा बदल आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतंर्गत आतापर्यंत 9.60 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन वर्षांत 75 लाख कनेक्शन देण्यात येणार आहेत.

कोणाला होणार फायदा

देशातील गरीब कुटुंबांना याचा फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारने 9.60 कोटी गॅस कनेक्शन दिले आहेत. पहिले रिफिल आणि शेगडी पण मोफत देण्यात येते. त्यासाठीचा खर्च ऑईल कंपन्या करतात. कॅबिनेटने यासोबतच ई-कोर्टस प्रोजेक्टच्या तिसऱ्या टप्प्याला पण मंजुरी दिली आहे. त्यासाठी 7210 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी

रक्षाबंधन निमित्त केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांची कपात केली होती. या कपातीनंतर गॅस सिलेंडरच्या किंमती दिल्लीत 903 रुपये झाल्या. तर उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी या किंमती 703 रुपये इतक्या झाल्या. येत्या काळात निवडणुकांचा हंगाम लक्षात घेता, केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्याची शक्यता आहे.

Free gas connection to 75 lakh women under Ujjwala Yojana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात