भर पावसात अजमेरमध्ये फडणवीसांची दणदणीत सभा; केवळ सत्ता परिवर्तन नाही, तर जनजीवनात परिवर्तनासाठी भाजपा!!


विशेष प्रतिनिधी

अजमेर : साताऱ्यातल्या पावसात भिजल्यानंतर म्हणे, शरद पवारांनी महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये परिवर्तन घडवून आणले!!.. पण ती वास्तविकता होती की नाही हा भाग अलहिदा… पण राजस्थानातील परिवर्तन यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र अजमेर मध्ये भर पावसात दणदणीत सभा झाली. huge meeting of Fadnavis in Ajmer in full rain

राजस्थानत भाजपने आयोजित केलेल्या विविध परिवर्तन यात्रांमध्ये सहभागी होताना, देवेंद्र फडणवीस यांचा आजचा तिसरा दिवस पुष्कर ते अजमेर अशा प्रवासाचा होता. रात्री अजमेरमध्ये भर पावसात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. उपस्थितांनीही फडणवीसंच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला.

आज तिसर्‍या दिवशी केकडी, नसिराबाद, किशनगड, अजमेर ग्रामीण आणि अजमेर शहरात त्यांनी जाहीर सभांना संबोधित केले. या दौर्‍यात प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, भाजपच्या राजस्थान सहप्रभारी विजयाताई रहाटकर आणि अन्य स्थानिक नेते त्यांच्यासोबत होते. परिवर्तन रथात सुद्धा जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले. आजच्या दिवसाची सुरुवात करताना त्यांनी पुष्कर येथील ब्रह्मदेवाच्या मंदिरात जाऊन पूजाअर्चना करून मनोभावे दर्शन घेतले.

त्यानंतर जाहीर सभांमध्ये फडणवीस म्हणाले की, राजस्थानात भाजपाला जे परिवर्तन घडवायचे आहे, ते परिवर्तन म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नाही. सत्ता परिवर्तन म्हणजे एक मुख्यमंत्री बदलून दुसरा किंवा एक मंत्री बदलून दुसरा मंत्री असे नाही, तर दलित, पीडित, शोषित, सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी हे परिवर्तन हवे आहे. हे समाज परिवर्तनाचे मिशन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 कोटी लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन केले आणि त्यांना गरिबी रेषेतून बाहेर काढले.

आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 6000 रुपये दिल्लीतून निघतात, तेव्हा ते पूर्ण 6000 रुपये थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जातात. राजीव गांधी म्हणायचे, पूर्वी 85 पैसे दलाल घ्यायचे आणि 15 पैसे सामान्य माणसाला मिळायचे, आज दलालांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करण्याचे काम मोदीजींनी केले आहे. अशोक गहलोत यांचे जागोजागी होर्डिंग लागले आहेत. त्यांनी 2030 पर्यंत राजस्थानला नंबर 1 चे राज्य बनविण्यासाठी लोकांकडून सूचना मागितल्या आहेत. त्यांना एकच सूचना द्या, तुम्ही बाजूला व्हा, राजस्थान आपोआप क्रमांक 1 वर येईल. आज केंद्राचा मोठा निधी राजस्थानला मिळतो आहे. पण, तो पूर्ण भ्रष्टाचारात जात आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीस गेल्या तीन दिवसांपासून राजस्थानातल्या परिवर्तन यात्रेत होते. त्यांच्या सभांना सगळीकडे जोरदार प्रतिसाद मिळला, पण महाराष्ट्रात मात्र काही नेत्यांना त्याची पोटदुखी जडून त्यांनी फडणवीसांवर शरसंधान साधले. खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या राजस्थान दौऱ्यावर टीका केली. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रण पेटले असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राबाहेर पक्षाच्या प्रचारात गुंतल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले, पण फडणवीस असल्या कुठल्याही टीकेला बधले नाहीत. त्यांनी राजस्थान दौरा सुरू ठेवला आणि त्यांना जनतेचा भरघोस प्रतिसादही मिळाला.

huge meeting of Fadnavis in Ajmer in full rain

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात