युवराज सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण!


या जागेवरून लोकसभा निवडणूक लढविण्याचीही चर्चा आहे


विशेष प्रतिनिधी

चंदीगड : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा बाजार तापला आहे. पक्षांतर्गत युतीबाबत केवळ चर्चाच सुरू नाही, तर नेत्यांनी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचेही वृत्त समोर येत असते.Discussion in political circles about whether Yuvraj Singh will enter BJP

पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू हे भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करू शकतात, अशी चर्चा याआधी होती, मात्र सिद्धू यांनी याचा पूर्णपणे इन्कार केला होता. आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतो परंतु क्रिकेटपटूने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.लोकसभा निवडणुकीपूर्वी युवराज भाजपमध्ये प्रवेश करू शकतो आणि त्याला गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता सनी देओलने गुरुदासपूरमधून निवडणूक लढवली होती आणि विजयी झाला होते.

देओल यापुढे या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळे भाजपाने गुरुदासपूरसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. यापूर्वी खासदार मनीष तिवारीही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

Discussion in political circles about whether Yuvraj Singh will enter BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात