विशेष प्रतिनिधी
मुंबई : संत फिंत गेले खड्ड्यात असे म्हणून संतप्त मनोज जरंगे पाटलांनी आधी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, पण तो अपमान अंगाशी येताच त्यांनी माफी मागून मोकळे होण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी त्यांनी जवळचे मित्र अजय महाराज बारस्कर यांना ढोंगी म्हणून त्यांच्यावर शरसंधान साधले. ukaram Maharaj insulted by Jarange
अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जरांगे हेकेखोर असून त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केल्याचेही ते म्हणाले. संत फिंत गेले खड्ड्यात असे म्हणून जरांगेंनी संत तुकाराम महाराज यांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. जरांगेंनी पाणी प्यावे असे मी त्यांना सांगायला गेलो होतो पण माझ्या हातून ते पाणी प्यायले असते तर मी मोठा झालो असतो. त्यामुळे माझ्या हातून पाणी प्यायला त्यांनी नकार दिला त्यावेळी त्यांनी संत फिंत गेले खड्ड्यात, असे उद्गार काढले होते असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला.
बारस्करांच्या आरोपांना उत्तरे देताना मनोज जरांगे यांनी संत तुकाराम यांच्या वक्तव्याबद्दल यांच्यावरल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पण बारस्कर यांचा उल्लेख भोंदू बाबा असा करत तो बावळट माणूस असल्याचंही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले :
आमच्या आंदोलनात बारस्करसह मुख्यमंत्री शिंदेंचा एक प्रवक्ता यात आहे. त्यांचा ट्रॅप खूप दिवसांपूर्वीच आम्हाला कळाला आहे. पण आता तुकाराम महाराजांविषयीचा शब्द माझ्या तोंडून गेला म्हणून त्याला पकडून हे डाव साधायला लागलेत. कारण या दोन-चार जणांना काहीही मिळाले नाही.
मी सरळ चूक मान्य केली. पण बाकीच्या त्याच्या प्रश्नांना मला उत्तरे द्यायची आहेत. मी मराठ्यांच्या बाजूने आहे, पण त्यांना जाळं टाकून बदनाम करायचे आहे.
मला असल्या चिल्लर लोकांवर बोलायचे नाही, हे कसले महाराज? मराठ्यांचे नुकसान करणारा माणूसच मला नको आहे. जगद्तगुरु तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन आयुष्यातील सरळ पहिली माफी मागतो. इतका मानतो मी त्यांना त्यांचा प्रसार करतोय मी. वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या आहे हा, मी विनाशी नाही. संत तुकाराम महाराजांबाबत माझ्या तोंडून शब्द गेले असतील तर ते माझ्या नाराजीतून चिडचिडीतून गेले असतील. तुकाराम महाराजांबद्दल आपली सपशेल माघार आहे.
बारस्करला फेसबुक लाईव्हसाठीही कोणी विचारत नाही. त्याला आता मीडियाचे लोक विचारायला लागले आहेत, म्हणजेच हा ट्रॅप आहे. पण एकच लक्षात ठेवा तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करु नका.
तुम्हाला जे सरकारकडून मिळवायचे होते, ते मी मिळू दिले नाही, म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करु नका. हा सरकारचा ट्रॅप आहे, असे 10 – 12 जण आहेत. मी त्याचवेळी सांगितलं होतं, त्यातला हा आता पहिला बाहेर आला आहे. बच्चू कडूंसोबत तो यायचा.
बारस्कर यांचा आरोप काय?
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेवर मोठे आरोप केले. मनोज जरांगे रोज पलटी मारतात, खोटं बोलतात, जरांगे पाटील हेकेखोर आहेत. त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केले आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत, असे बारस्कर म्हणाले.
मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या, जरांगेंच्या बैठका रात्री होतात. लोकांची फसवणूक केली आहे. मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. मी प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी आरोप करत आहे असं नाही. मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही. आताच हे का झालं? काही दिवसांपासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली, असेही त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App