मनोज जरांगे नाटकी माणूस, मुलांमध्येही भरला अहंकार; जवळच्याच मित्राचे शरसंधान!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीसांच्या सरकारने मराठा समाजाला 10 % आरक्षण देऊनही समाधान न झाल्याने आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर त्यांच्या जवळच्या मित्राने अत्यंत गंभीर आरोप केले. मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याने स्वतःच्या मुलांमध्ये देखील अहंकार भरला आहे. म्हणूनच त्याची मुलगी देव माझ्या बापाच्या पाया पडेल, असे म्हणते, अशा शब्दांमध्ये अजय महाराज बारस्कर यांनी शरसंधान साधले.Manoj Jarange Dramatic man, full of arrogance even in children; Sharsandhan of a close friend!!



बारस्कर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात अग्रभागी आहेत. पण ते आत्तापर्यंत माध्यमांसमोर आले नव्हते. जरांगे पाटलांच्या प्रत्येक मीटिंगमध्ये ते सहभागी व्हायचे. परंतु जरांगे पाटलांनी काही मीटिंग गुप्त घेतल्या. सरकारी अधिकार्‍यांबरोबर गुप्त वाटाघाटी केल्या. त्या अजय महाराज बारस्कर यांना पटल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले.

अजय महाराज बारस्कर म्हणाले :

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. पण मी यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलो नाही.

मी मनोज जरांगे याला पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही.

मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याचा मिटिंग रात्री होतात. वाशीला आंदोलल पोहचलो. त्या रात्री पुन्हा गुप्त मिटिंग केल्या. अधिसूचनेत म्हटले होते की, ते 16 तारखेला लागू होईल. पण मनोज जरांगेची इच्छा होती, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे येऊन मला पाणी पाजावे. जरांगेला फक्त श्रेय हवे. जेसीबीतून फुलं हवीत. मोठे कार्यक्रम हवेत. गरीब मराठ्याला आरक्षण हवेच आहे, पण मनोज जरांगेचे काय? याला तर फक्त श्रेय ओरबाडून घ्यायचे आहे.

मनोज जरांगेची मुलगी म्हणते, माझ्या बापाच्या देव पाया पडेल. मुलांमध्ये इतका अंहकार?? सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का?? हा माझ्यावर आरोप करतो, की मी सरकार आणि छगन भुजबळ यांचा माणूस आहे. पण माझा कोणाशीही बिलकूल संबंध नाही.

आजपर्यंत एकही पत्र मनोज जरांगेने सरकारला स्वतः दिलं नाही. तो रोज पलटी मारतो. तो सगळ्या मिटिंग कॅमेरावर करतो. याला घोडा लावतो त्याला घोडा लावतो, असं म्हणतो. असभ्य भाषेत शिवीगाळ करतो.

मनोज जरांगेने 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग केली. मी त्या मिटिंगला साक्षीदार आहे. रांजणगाव गणपती इथे उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत गुप्त मिटिंग केली. लोणावळा, वाशीमध्येही त्याने समाजाला वगळून मिटिंग केली. वाशी आंदोलनापर्यंत मी आंदोलक म्हणून त्याच्याबरोबर सामील होतो. मात्र त्याच्या गुप्त मिटिंगांवर माझा आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. 15 मिनिटांत शासन निर्णय आणि अधिसूचना द्या, अर्धवट ज्ञान बेक्कार असे तो म्हणतो पण स्वतःचे काय??

Manoj Jarange Dramatic man, full of arrogance even in children; Sharsandhan of a close friend!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात