Moody’sने वाजवली धोक्याची घंटा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या काळातून जात आहे. दरम्यान, जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने पाकिस्तानचे क्रेडिट रेटिंग कमी केले आहे. मुडीजच्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामुळे त्यांना गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, देशाला गंभीर आर्थिक संकटातून सोडवण्याचे मोठे आव्हान आगामी सरकारसमोर असेल.Pakistan took only 30 days to repay its debt of three billion dollars
मूडीजने दावा केला आहे की राजकीय अनिश्चिततेमुळे, पाकिस्तानच्या नवीन सरकारला एप्रिलमध्ये नवीन कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) शी संपर्क साधणे कठीण होईल कारण त्यांच्यावर आधीपासूनच 49.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे.
आयएमएफने गेल्या वर्षी जून महिन्यात पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते, ज्याचा नऊ महिन्यांचा कालावधी आता संपत आहे. दुसरीकडे आर्थिक मदतीसाठी पाकिस्तानला पुन्हा मोठ्या कर्जाची गरज आहे. मूडीजने पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा वाजवली असून एप्रिलपर्यंत पाकिस्तानची तिजोरी रिकामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी कोलमडून पडेल, जी त्यांना सांभाळणे कठीण होईल.
पाकिस्तानचे पतमानांकन घसरले
मूडीजने पाकिस्तानच्या कर्जाचे क्रेडिट रेटिंग घसरले आहे. त्यांचे रेटिंग CAA1 वरून CAA3 वर कमी केले गेले आहे, जे डीफॉल्टपेक्षा फक्त 2 नॉच वर आहे. मूडीजचा हा दावा पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे कारण देशाची अर्थव्यवस्था केवळ आयएमएफच्या कर्जाच्या मदतीने चालत आहे. पाकिस्तानला 2023 मध्येच IMF कडून कर्ज मिळाले होते, पण 2024 च्या सुरूवातीला पुन्हा कर्जाची गरज भासेल.
पाकिस्तानच्या रुपयाची अवस्थाही बिकट झाली आहे. त्याचे मूल्य दिवसेंदिवस घसरत आहे. पाकिस्तानचा एक रुपया भारताच्या 30 पैशांच्या बरोबरीचा आहे आणि एका अमेरिकन डॉलरचे मूल्य पाकिस्तानच्या 277 रुपयांवर पोहोचले आहे. इस्लामाबादच्या थिंक टँक टॅब ॲड लॅबनेही पाकिस्तानमधील परिस्थितीवर एक अहवाल तयार केला असून अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था खोलवर बुडेल आणि पाकिस्तान डिफॉल्टरच्या दिशेने जाईल, असे म्हटले आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडणे पाकिस्तानसाठी कठीण होणार आहे. त्याची अर्थव्यवस्था सर्व बाजूंनी वेढलेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more