विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र 41 जागांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. येथे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्याचबरोबर राज्यसभेच्या 15 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. Rajya Sabha Polls 2024 Candidates won unopposed in 41 seats BJP got 20 seats
बिनविरोध झालेल्या 41 पैकी सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या असून भाजपला 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. वायएसआर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या. आरजेडी आणि बीजेडीला दोन जागा मिळाल्या. राष्ट्रवादी, शिवसेना, BRS आणि JD(U) यांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी; भाजपने इन्कमिंग आणि निष्ठावंत यांचा साधला मेळ!!
उत्तर प्रदेशात दहा जागांवर निवडणूक होणार आहे. भाजपला सात जागा आणि सपा तीन जागा जिंकू शकते, असे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३७ प्रथम पसंतीची मते आवश्यक आहेत. भाजपला आठ उमेदवार मिळाल्यास, पक्षाला २९६ आमदारांच्या पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता असेल. एनडीएला विधानसभेत २८६ आमदारांचा पाठिंबा आहे. हे आवश्यक संख्याबळापेक्षा दहाने कमी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App