Delhi Liquor Scam: आता CBIने ‘या’ बड्या नेत्याला पाठवले समन्स!

२६ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली अबकारी धोरण ‘घोटाळा’ प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि बीआरएस नेत्या के. कविता यांना पुढील आठवड्यात बोलावण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, कविता यांना सोमवारी येथील सीबीआय मुख्यालयात तपास पथकासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.Delhi Liquor Scam Case K CBI sent summons to Kavita



अधिकाऱ्यांनी सांगितले की, एजन्सीने यापूर्वी कविता यांचे हैद्राबाद येथील निवासस्थानी डिसेंबर 2022 मध्ये बयान नोंदवले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोप केला आहे की या प्रकरणातील आरोपी विजय नायर याने आम आदमी पार्टीला देण्यासाठी ‘साउथ ग्रुप’ नावाच्या गटाकडून किमान 100 कोटी रुपये मिळवले.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही याच प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करू इच्छित आहे, परंतु केजरीवालांनी 19 फेब्रुवारी रोजी सहाव्यांदा फेडरल एजन्सीसमोर हजर राहण्यास नकार दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीने म्हटले की, केजरीवाल यांना वारंवार समन्स पाठवण्याऐवजी ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजय सिंह हे उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत. हे प्रकरण 2021-22 साठी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, जे नंतर रद्द करण्यात आले. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या शिफारशीनंतर सीबीआयने कथित भ्रष्टाचारप्रकरणी एफआयआर नोंदवला होता.

Delhi Liquor Scam Case K CBI sent summons to Kavita

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात