मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. Delhi Excise Policy case Manish Sisodian’s judicial custody extended again
मनीष सिसोदिया आज हजेरीसाठी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात पोहोचले होते. येथील सुनावणीदरम्यान सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत वाढ करण्यात आली.
उल्लेखनीय आहे की याआधी 2 फेब्रुवारी रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टात मनीष सिसोदिया यांच्या नियमित जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांच्यासमोर ईडीने सिसोदिया यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता. सिसोदिया यांनी आपल्या नियमित जामीनासोबतच आपल्या आजारी पत्नीला आठवड्यातून दोन दिवस भेटण्यासाठी पॅरोलची मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more