‘’युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती…’’ आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!


‘’तुम्ही ढाळताय ते मगरीचे अश्रू आहेत हे मुंबईकर ओळखून आहेत.’’ असंही शेलारांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटाने आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेतील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराच्या मुद्य्यावरून काल मोर्चा काढला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार व भाजपावर टीका केली. शिवाय, मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना इशाराही दिला. तुमच्या फाइल्स तयार आहेत, आमचं सरकार आल्यावर तुमची जागा दाखवू, असं त्यांनी म्हटलं. यावरून आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना  प्रत्युत्तर दिले आहे. BJP MLA Ashish Shelar criticizes Aditya Thackeray

आशिष शेलार म्हणतात,  ‘’ज्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना उबाठा गटाने 25 वर्षे मुंबई महापालिकेत पोसले, लाड केले त्या कंत्राटदारांना आता कामं मिळत नाहीत म्हणून थयथयाट सुरू आहेच. आज तर युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती की काय, असा प्रश्न पडला आहे.’’

याशिवाय, ‘’उबाठा गटाच्या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे यांनी जे आज प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये मुंबईकरांची काळजी कुठे होती? यालाच कंत्राट का, किंवा त्यालाच कंत्राट का असे प्रश्न म्हणजे यांच्या कंत्राटदारांना का नाही असे त्यांचे प्रश्न आहेत. हा काय मुंबईकरांसाठी विचारलेला प्रश्न नव्हता. एवढे रस्ते कशाला? एवढी स्ट्रीट फर्निचरची खरेदी कशाला? म्हणजे मुंबईकरांसाठी फर्निचर खरेदी केली ती यांच्या कंत्राटदारांकडून का नाही असेच ना? स्ट्रीट फनिर्चरच्या खरेदीची चर्चा करताय? मग ईडी मध्ये समोर आलेल्या युसूस फनिर्चरवाल्याच्या फ्लॅट मध्ये कोविड काळात देवाणघेवाणीचे व्यवहार झाल्याची जी माहिती उघड होतेय, यावर का बोलत नाहीत?’’  असंही शेलारांनी म्हटलं

याचबरोबर, ‘’मुंबईच्या रस्त्यांची कामे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे कंपन्या करतात, चांगल्या दर्जाचे रस्ते, वीस वर्षांची हमी घेऊन केली जात आहेत. रस्त्यांची कामे करताना युटिलिटी डक तयार केले जात आहेत. याकडे दुर्लक्ष करून सगळी चर्चा कंत्राटदारांची आजच्या मोर्चात पहायला मिळाली. कोविड काळात मुंबईच्या बिल्डरांना 50 टक्के प्रिमियममध्ये सूट देण्याची खैरात केलीत, त्यामुळे मुंबई महापालिकेचे 12 हजार कोटींचे नुकसान झाले, ताज हॉटेलला सुट दिलीत ही पालिकेच्या तिजोरीची लूट नाही का? तुम्ही ढाळताय ते मगरीचे अश्रू आहेत हे मुंबईकर ओळखून आहेत. त्यामुळे आम्ही “चोर मचाए शोर” हे जे तुम्हाला म्हणतोय, ते मुंबईकरांना पटेल.’’ असं म्हणत आशिष शेलार यांनी टीका केली.

BJP MLA Ashish Shelar criticizes Aditya Thackeray

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात