इतरांच्या मानवी चुका, पण फडणवीसांच्या द्वेषापोटी समृद्धी महामार्गावर ठपका!!


बुलढाणा अपघातानंतर समृद्धी महामार्गाला दोष देण्याची स्पर्धा विशिष्ट माध्यमांमध्ये लागली आहे. त्यात महामार्गाच्या तांत्रिक चूका दाखवताना देवेंद्र फडणवीसांचा द्वेष जास्त दिसतो आहे. Others’ human mistakes, but due to Fadnavis’s malice, prosperity is the highwayमी, समृध्दी महामार्गवरून 7200 किलोमीटरचा दिवस – रात्री दोन्ही वेळा सुरक्षित प्रवास केला आहे.

‘समृद्धी महामार्ग’ तंत्रशुद्ध स्थापत्य अभियांत्रिकेचा अतिशय उत्तम असा नमुना आहे. अपघात दुर्दैवी मानवीय दोष आहे.

मी, समृद्धी महामार्गवरून 6 वेळा प्रवास केला आहे. 11 डिसेंम्बर 2022 ते 30 जून 2023 प्रयन्त माझा जवळपास 7200 किलोमीटरचा समृद्धी महामार्गवर सुरक्षित प्रवास माझा झाला आहे. काल खाजगी बसचा जेंव्हा अपघात झाला, त्यावेळी मी अकोला – नागपूर समृद्धी महामार्गवरून प्रवास करत होतो.

खाजगी बसचा अपघात हा दुर्दैवी घटना आहे. पण, घटना जरी दुर्दैवी असली, अपघाताला मात्र मानवी दोष कारणीभूत आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट असलेला समृद्धी महामार्गाला काही मानवीय चुका बदनाम करण्याचं काम करत आहेत. ज्या मानवीय चुका आहेत त्या जास्त मोठ्या नाहीत किरकोळ आहेत त्याच किरकोळ चुका प्राणघातक ठरत आहेत.

पण, कालच्या अपघातावरून राजकारण आणि काही प्रादेशिक प्रिंट माध्यमातून समृद्धी महामार्ग हा कसा मृत्यूचा समृध्द महामार्ग आहे अश्या मथळ्याखाली लेख लिहून टाकत आहेत. लेख वाचल्यावर कळलं की, अत्यंत द्वेषपूर्ण भावना लेखकाने त्या लेखकात व्यक्त केली आहे. कारंडे नावाचा पत्रकार देखील अश्याच पद्धतीने आलाप चालू केला आहे. सुरवात लोकसत्ताने केली, त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचा नंबर लागतो.

या लोकांनी फक्त भाजप द्वेष, देवेंद्र फडणवीस द्वेष हाच अँगल ठेवून या अपघाताचे विश्लेषण करण्यात मग्न झाले आहेत. पण, भाजप विरोध म्हणून यांनी अश्या अपघाताचे राजकारण करत आहेत, या पेक्षा मोठी विकृती असूच शकत नाही. ज्या महामार्गाला हे मृत्यूचा समृद्ध महामार्ग म्हणून हिनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी.

आजपर्यंत या लोकांनी ज्या लोकांकडून पाकीट घेऊन पत्रकारिता केली आहे. त्या लोकांनी असे कधी महामार्ग बांधलेच नाहीत. त्यामुळं ज्यांनी चांगलं केलं त्यांच्या कामाला नाव ठेवण्याची स्पर्धा या अपघाताच्या निमित्ताने पाकीट पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे.

पण, या लोकांनी किती चुकीची माहिती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला फरक पडत नाही समृद्धी महामार्ग हा अतिशय तंत्रशुद्ध स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहेच त्याच बरोबर खरोखर महाराष्ट्राला समृद्ध बनवण्याचा मार्ग आहे.

समृद्धी महामार्गमुळे 800 किलोमीटरचा प्रवास हा फक्त 8 तासांवर आणला आहे. नागपूर – मुंबई अंतर रेल्वेने 12 तास ( सुपरफास्ट ) सर्वसाधारण एक्सप्रेसने तो प्रवास 14 तासांवर येतो. हे काही थेरॉटिकल बोलत नसून, मी या मार्गावर 6 वेळा प्रवास केला आहे. एवढं अंतर कमी करण्यासाठी या महामार्गाचे डिजाईन देखील अपघात विरहित केलं आहे, आणि प्रवासाचा खर्च देखील कमी केला आहे.

समृद्धी महामार्गची वैशिष्ट्ये :

  •  महामार्गावर स्पीड लिमिट ठरवून दिल आहे. अवजड वाहने 80 किलोमीटर प्रति तास शेवटची लेन.
  •  जीप व प्रवासी बसेस 100 किलोमीटर प्रति तास मिडलची लेन.
  •  120 किलोमीटर प्रतितास एवढी दिली आहे. वरील सर्व लेन प्रशस्त आहेत.
  •  800 किलोमीटरचा 8 तासात पूर्ण करण्यासाठी महामार्गातील घाट सेक्शन काढून रोडचा ग्रेडियंट रेशो (चढ आणि उतार प्रमाण) देखील असा ठेवला आहे की, गाडी चढण चढताना इंजिनिवर कोणताही लोड येत नाही आणि Extra गीअर टाकण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे गाडीच्या स्पीडवर कोणताही परिणाम होत नाही.
  •  याच ग्रेडीएन्ट मुळे अपणला समोर 5 किमी आणि पाठिमागे सुद्धा 5 किमी पर्यंतचे सहजपणे बघू शकतो.
    त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होतो.
  •  ज्या ठिकाणी वळण आहेत, त्या ठिकाणी वळण असेल तिथे कर्व्ह लेंथ एवढी मोठी ठेवली आहे की, वळण असताना देखील तुम्हाला स्पीड कमी करण्याची गरज पडत नाही. नेहमी अपघात वळणावर होतात. स्पीड जास्त असल्याने गाडी महामार्गावरून खाली येऊ शकते किंव्हा डीवाइडरवर आदळते. पण, इथं कर्व्ह लेंथ मोठी असल्याने इथे देखील अपघाताची शक्यता कमी केली.

सुरवातीच्या काळात वन्य प्राणी रस्त्यावर येऊन, गाडीचा अपघात होयचे, सुरवातीला सिमेंट रस्ता गुळगुळीत राहत नाही त्यामुळे जुने टायर त्यावर फुटले जायचे. पण आता हे प्रकार बंद झालेत. पण, कालचा ऍकॅसिडेंट हा नेमका कसा झाला याबद्दल चौकशी होणार आहे. सत्य बाहेर येईलच.

पण, हा अपघात समृद्धी महामार्गमुळे झाला असा एक नारेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या पाकीट पत्रकार आणि शरद पवार यांच्याकडून होत आहे. यांनी असे महामार्ग बांधले नाहीत, शरद पवारांनी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या पण, त्यांना मोबदला दिला नाही. त्यामुळे शरद पवार सारख्या धूर्त व्यक्तीच्या मनात राज्याबद्दल चांगली भावना नाहीच.

अपघात होण्याची कारणे :

मी, या महामार्गवरून 6 वेळा पूर्ण दिवस, पूर्ण रात्र प्रवास केला आहे. या महामार्गवर मी, लाईट वेट असलेली Wagon R ( T- Permit ) , स्कोर्पोओ, क्रेस्टा ह्या सर्व गाडीची वेग मर्यादा 100 – 120 च्या आत होती.

महामार्गावर प्रवेश करताच शेवटचा गिअर एकदा टाकला एक्सिलेटरवर पाय पडला की तो काढण्याची गरज पडत नाही. त्यानंतर वाहतुकीची रहदारी कमी असल्याने साईडला बघणे, व्होरटेक करणे, हॉर्न वाजवणे इत्यादी क्रिया होत नाहीत. त्यामुळं चालक हा एकटक समोर बघून गाडी चालवत असतो. गाडी चालवताना ड्रायव्हर हा ऍक्टिव असला पाहिजे.

पण, गाडीचा वेग आणि रस्ता या संमोहात त्याचा बॅलन्स जातो अचानक एक्सिलेटरवर पायाचा प्रेशर नकळत पडतो गाडीचा वेग वाढतो आणि अपघात होतात. यासाठी चालक हा ऍक्टिव्ह असला पाहिजे, चालकाच्या बाजूला बसणारा देखील ऍक्टिव्ह असला पाहिजे.

गाडीची फिटनेस बद्दल असलेली गाडी मालकाची उदासीनता हे देखील अपघाताला कारणीभूत आहे. सुरवातीला टायर फुटून झालेले अपघात सर्वस्वी गाडी मालकाची चुकी. ओव्हर स्पीड हा देखील मोठा कारण आहे.

 सर्वाधिक रस्ते अपघात तामिळनाडू मध्ये.

सर्वाधिक रस्ते अपघात तामिळनाडू राज्यात होतात. आणि महामार्ग म्हटल्यावर अपघात होतात, अपघात होऊनये म्हणून चालकांनी काळजी घेतली पाहिजे. पण, हायवे बांधले म्हणून अपघात होतात म्हणणारी प्रजाती फक्त आणि फक्त महाराष्ट्रात जन्माला आली आहे.

ज्या ज्या ठिकाणी रस्ते अपघात झालेले त्यातील सर्वात मोठे कारण ओव्हर स्पीड आलेलं आहे. 700 किमी चा समृद्धी महामार्ग 7 महिन्यात ऍकॅसिडेंट जवळपास 100 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. तुम्हाला माहिती नसेल मुंबई – पुणे 94 किलोमीटरच्या मार्गात जानेवारी ते एप्रिल पर्यंत 63 वेळा अपघात झाले आहेत. त्यात 66 लोकांनी आपला प्राण गमावला आहे. अपघात होऊ नये ही सर्वस्वी जबाबदारी चालकाची आहे.

पण, ज्या लोकांनी राज्यात स्वातंत्र्य भारतात सिंगल रोडच्या वर रस्ते बांधले नाहीत, त्या लोकांनी फक्त देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करण्यासाठी समृद्धी महामार्गला दोष देत राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

(सौजन्य : फेसबुक)

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*