‘’पवार, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले’’ बावनकुळेंचा शरद पवारांवर घणाघात!

BJP Leader ChandraShekhar Bawankule Criticizes Shiv Sena In Amrawati District

‘’मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का?’’ असा सवालही केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  समृद्धी महामार्गावर अपघातात जो मरण पावतो तो “देवेंद्रवासी” होतो, असे लोक म्हणतात, अशी राजकीय टीका करून पवारांनी आपली पातळी घसरल्याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  BJP state president Chandrashekhar Bawankule strongly criticized Sharad Pawar

चंद्रशेखर बावनकुळे म्हणातात, ‘’समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत, वेळेची बचत होत आहे. देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. असे सगळे सर्वांना माहीत असूनही, देवेंद्र फडणवीसांचा व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी आज शरद पवार यांनी गाठली.’’

समृद्धी महामार्गावरील या अपघाताबद्दल मत मांडताना शरद पवारांना कळस गाठला असल्याचं सांगत “आमच्या गावात आता चर्चा अशी आहे, की एखादा दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.” हे शरद पवारांचं विधान त्यांनी सर्वांसमोर आणलं.

याशिवाय ‘’शरद पवार, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले. पवार गोवारी विसरले!, पवार मावळचा गोळीबार विसरले..!, पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले…!, हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले.’’ याची आठवणीही करून दिली.

याचबरोबर  ‘’गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते.  मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे,  मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही, पवार या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का? पवार, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले. तुम्ही आज मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, ही म्हणही सिद्ध करून दाखवली.’’ अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

BJP state president Chandrashekhar Bawankule strongly criticized Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात