वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमधील सत्ता राखण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्रिय झाला असून उमेदवार छाननी समितीचे नेतृत्व अजय माकन करतील, तर प्रचाराची धुरा माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्याकडे सोपविण्यात आली. Congress became active in Punjab
पंजाबमधील वाद मिटविताना हरीश रावत यांनाही लागला गुण, उघडपणे व्यक्त केली नेतृत्वाविरुध्द नाराजी
हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मंजुरीनंतर विविध समित्यांचा तपशील जाहीर करण्यात आला. छाननी समितीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, जाखड, चंदन यादव, कृष्णा अलावारू, आदींचा समावेश असेल. पंजाबचे प्रभारी ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी समन्वय समितीच्या प्रमुख असतील. राज्यसभेचे खासदार प्रतापसिंग बाजवा यांच्याकडे जाहीरनामा समितीची सूत्रे असतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App