पंजाबमधील वाद मिटविताना हरीश रावत यांनाही लागला गुण, उघडपणे व्यक्त केली नेतृत्वाविरुध्द नाराजी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: प्रभारी या नात्याने पंजाबमधील कॉँग्रेसमधील वाद मिटविताना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनाही बंडखोरीचा गुण लागला आहे. उत्तराखंडमध्ये फ्री हॅँड मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ज्या समुद्रात पोहायचे आहे तिथे सत्ताधीशांनी आधीच मगरी सोडून संकट उभं केलं आहे, असे त्यांनी म्हटले आहे.While resolving the dispute in Punjab, Harish Rawat also got the mark, openly expressing his displeasure against the leadership

यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. उत्तराखंडमध्ये फ्री हँड दिला जात नसल्याने आणि संघटनेतून सहकार्य मिळत नसल्याचे रावत यांनी म्हटले आहे. रावत हे ५ जानेवारी रोजी मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



देशातील अनेक राज्यांसाठी नववर्ष निवडणुकांचं वर्ष ठरणार आहे. त्यासाठी राजकीय मोचेर्बांधणीही सुरू आहे. प्रामुख्याने काँग्रेससाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळेच पक्षाची नव्याने उभारणी करण्यासाठी एकीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कंबर कसली असताना काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही कमी होताना दिसत नाही.

आता उत्तराखंडमधून संघटनात्मक पातळीवरील अस्वस्थता समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री हरीश रावत हेच या स्थितीतून जात असून त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याबाबतचे पत्ते अजून उघडले नाहीत.

अशावेळी हरीश रावत यांनी थेट निवार्णीचीच भाषा केली आहे. रावत यांचे ट्वीट पाहता ते हायकमांडवर नाराज असल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे रावत हे पंजाबचे प्रभारी असून रावत यांची नाराजी मोठ्या भूकंपाचे संकेत देत आहे.

हरीश रावत यांनी अत्यंत सूचक ट्वीट केलं आहे. ‘निवडणूकरूपी समुद्रात पोहायचं आहे. अशावेळी संघटनात्मक पातळीवर सहकार्याचा हात पुढे येताना दिसत नाही. पाठ फिरवणारी आणि नकारात्मक भूमिका घेणारी मंडळीच अधिक आहे. ज्या समुद्रात पोहायचे आहे तिथे सत्ताधीशांनी आधीच मगरी सोडून संकट उभं केलं आहे.

दुसरीकडे ज्यांच्या आदेशाने पोहायचं आहे त्यांचेच आज्ञाधारक माझे हातपाय बांधून ठेवत आहेत. मग मनात अनेकदा विचार येतात, ‘भरपूर पोहून झालं. आता विश्रांतीची वेळ आली आहे’ पण पुढच्याच वेळी मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून वेगळा आवाज येतो. ‘न दैन्यं न पलायनम्’ असं मन सांगतं आणि स्थितीशी दोन हात करावे असे वाटत राहते.

एका द्विधामन:स्थितीतून मी सध्या जात आहे. नवं वर्ष यातून मार्ग दाखवेल अशी आशा आहे. भगवान केदारनाथ माझे मार्गदर्शक ठरतील हा माझा विश्वास आहे’, अशा भावना व्यक्त करत हरीश रावत बरंच काही सांगून गेले आहेत.

While resolving the dispute in Punjab, Harish Rawat also got the mark, openly expressing his displeasure against the leadership

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात