तृणमूलवर कॉंग्रेसला कमकुवत करण्याचा आरोप करत हरीश रावत यांचा प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसकडून कॉंग्रेसला कमकुवत करण्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकारिणी सदस्य हरीश रावत यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधला आहे. आधी काँग्रेसमध्ये या आणि मग तुमचे ज्ञान पाजळा असे त्यांनी म्हटले आहे.Accusing Trinamool of weakening Congress, Harish Rawat targets Prashant Kishor

हरीश रावत यांच्या या भूमिकेनंतर आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच वादाला नवे तोंड फुटू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तृणमूल काँग्रेसकडून नेत्यांना लालूच दाखवून पक्षात प्रवेश करून घेतला जात आहे.



हा सगळा काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे विरोधकांचे ऐक्य मजबूत होणार नाही, असा आरोप रावत यांनी केला आहे.रावत म्हणाले, काँग्रेस पक्ष कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही.

त्यांनी आधी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि नंतरच आपले ज्ञान पाजळावे. कोणतीही व्यक्ती जी भारताची नागरिक आहे आणि स्वतंत्रता आंदोलन तसेच काँग्रेसवर, काँग्रेस विचारसरणीवर विश्वास ठेवणारी आहे, ती व्यक्ती पक्षात प्रवेश करू शकते. त्यामुळे प्रशांत किशोरही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.

आम्ही नेहमीच नवीन विचारांचे स्वागत केले आहे. मात्र, काही झाले, तरी काँग्रेस पक्ष कोणाही एका व्यक्तीचा गुलाम होऊ शकत नाही. ती व्यक्ती कितीही सक्षम असली, तरी आता सगळे तुम्हीच सांभाळा, असे काँग्रेसमधील कोणीही म्हणणार नाही. आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि नंतर ज्ञान द्यावे.

Accusing Trinamool of weakening Congress, Harish Rawat targets Prashant Kishor

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात