जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस कार्यकारिणीत मनमोकळी चर्चा करा, पण ती या चार भिंतींमध्येच ठेवा, असे सोनिया गांधी या काँग्रेसच्या जी २३ नेत्यांना सुनावत असताना ट्विटर सारख्या सोशल मीडियावर मात्र, यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड करण्यात आला आहे. While Sonia is listening to G23 leaders, #YehDilMangeRahul strongly trends on Twitter

काँग्रेस फॉर इंडिया या ट्विटर हँडलवरून सुरू झालेला हा ट्रेंड गेल्या दोन तासांपासून भारतात टॉप १० मध्ये ट्रेंडिंग दिसतो आहे. याचा राजकीय अर्थ उघड आहे, सोनिया गांधींना पक्षाच्या कार्यकारिणीत जरी मनमोकळी चर्चा हवी असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेगळचे प्रमोट करण्यात येताना दिसते आहे.



काँग्रेस कार्यकारिणीमध्ये मनमोकळी चर्चा करू या. मी त्याचे स्वागतच करते परंतु ही चर्चा चार भिंतीमध्येच राहू द्या. बाहेर जाताना आपल्यामध्ये एकमतच असले पाहिजे. माध्यमांशी बोलताना संपूर्ण कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे असे चित्र उभे राहिले पाहिजे, असा इशारा सोनिया गांधी यांनी जी 23 नेत्यांचे नाव न घेता दिला आहे.

पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचे महत्त्व मी जाणते त्या व्हायलाच पाहिजेत, असे माझे मत आहे परंतु काँग्रेस कार्यकारिणीने मला पक्षाचे हंगामी अध्यक्ष नेमले आहे. त्यामुळे आपण एकत्रित काम करून पुढे गेले पाहिजे. स्वयंशिस्तीने आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक असली पाहिजे असे देखील सोनिया गांधी यांनी लेखी निवेदनात आवर्जून नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या दोन – तीन तासांमध्ये यह दिल मांगे राहुल हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करून काँग्रेस समर्थकांनी देखील एक वेगळाच राजकीय संदेश दिल्याचे स्पष्ट होत आहे.

While Sonia is listening to G23 leaders, #YehDilMangeRahul strongly trends on Twitter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात