वचन दिले होते तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते ना…!!; फडणवीसांचे टोले


  • राज, राणे यांना शिवसेनेतून बाहेर का जावे लागले?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजपवर जोरदार वार केल्यानंतर भाजपनेही मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर पलटवार केला आहे. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे होते. मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावे लागले? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचे नव्हते. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावे लागले?’ असा सवाल करुन उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. Bjp Leader Devendra Fadanvis Reaction On Cm Uddhav Thackeray Speech On Dasara Mela

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यांवरुन जोरदार टोलाही लगावला होता. मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.



उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्त्वकांक्षा असणे गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणे कितपत योग्य आहे?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तुमची महत्त्वकांक्षा ती तुम्ही पूर्ण केली त्यामुळे दोष देणे थांबवा. आता दोन वर्ष झालीत आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटले जायचे. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिलं. जनतेने भाजपला नाकारले नाही. काँग्रसे राष्ट्रवादीला नाकारले. शिवसेनेला वरपास केले याच त्यांना विस्मरण झाले आहे. आम्ही ७० टक्के जागा जिंकल्या. तुम्ही ४५ टक्के जागा जिंकल्या. तुम्हाला जनतेने नाकारले. तुम्ही बेईमानी करुन सत्तेवर आलात हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे,’ अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले होते की, महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. पण बंगाल करायचाय म्हणजे काय करायचंय? यूनियनबाजी आणि खंडणीने बंगालमध्ये एकही उद्योग टिकला नाही. कोलकाताची आजची व्यवस्था काय आहे हे माहिती आहे का? आणि तुम्हाला बंगाल करायचाय म्हणजे जो तुमच्या विरोधात बोलेल त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकावयाचं आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र घडवणार आहे का? जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेले ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही,’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही पद्धत बदलली पाहिजे म्हणजे काय?, आंबेडकरांचे संविधान बदलण्याचे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले. काहीही हे मनसुबे आणि झुपा अंजेडा काही डाव्या विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन रचताय पण काहीही झालं तरी तो कधीच पूर्ण होऊ देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Bjp Leader Devendra Fadanvis Reaction On Cm Uddhav Thackeray Speech On Dasara Mela

महत्त्वाच्या बातम्या

Congress CWC meeting : कोण होणार अध्यक्ष?अखेर हायकमांडने बोलावली बैठक ; कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक आज ह्या मुद्द्यांवर चर्चा

भारतीय वंशाचे रवी चौधरी पेंटागॉन मधील महत्त्वाच्या पदावर

दलित शेतमजूराच्या हत्येनंतर ‘फुरोगाम्यां’मध्ये ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’

Good News : टीम इंडियाची सूत्र ‘द वॉल’ कडेच ; राहुल द्रविडचा होकार ; अखेर होणार हेड कोच …

जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले; तुम्हाला वरपास केले; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात