यवतमाळमधील ढोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण ; पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला मिळाले शुभाशीर्वाद


मोदींचे हे पत्र ढोरे कुटुंबियांना २२ डिसेंबर रोजी मिळाले. तेंव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावेना . Happy atmosphere in Dhore family in Yavatmal; The newlyweds received congratulations from Prime Minister Modi


विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावातील एका तरुणाने आपल्या लग्नाची पत्रिका देशाच्या सर्वोच व्यक्तीला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली होती.पत्रिका पाठविणाऱ्या तरुणाचे नाव अॅड राहुल ढोरे आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून शुभ संदेश पाठविल्याने ढोरे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. ढोरे यांच्या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी ढोरे कुटुंबाच्या निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आहे.तसेच वधूवरांना लग्नाच्या शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले आहेत.मोदींचे हे पत्र ढोरे कुटुंबियांना २२ डिसेंबर रोजी मिळाले. तेंव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावेना .मोदींनी शुभेच्छा संदेशात काय लिहिले ?

राहुल आणि मयुरी तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. नवजीवनात तुम्हाला सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..

Happy atmosphere in Dhore family in Yavatmal; The newlyweds received congratulations from Prime Minister Modi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था