प्रियांका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत; प्राथमिक चौकशीतला निष्कर्ष


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, प्राप्तिकर खाते – आयटी, सीबीआय आणि अन्य तपास संस्थांचा गैरवापर करत आहेच, ते फोन टॅपिंगही करतात. पण आता माझ्या मुलांची देखील इंस्टाग्राम अकाउंटस् ते हॅक करत आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला होता. Priyanka Gandhi’s children’s Instagram accounts not hacked; Conclusion of the preliminary inquiry

प्रियांका गांधींच्या या आरोपांची केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून लवकरच या आरोपांसंदर्भात चौकशी करण्यात करण्यात येईल, असे सरकारी सूत्रांनी आज स्पष्ट केले होते. परंतु आता या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून यामध्ये प्रियांका गांधी यांच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत असे स्पष्ट झाले आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अर्थात हा प्राथमिक चौकशीत असा निष्कर्ष आहे याची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही मंत्रालयाने सांगितले आहे. प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक करण्याचा आरोप करून नवा राजकीय बॉम्ब फोडला होता.उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नातेवाईकांवर ईडी आणि आयटीचे छापे पडत आहेत. याबाबत प्रश्न विचारले असता प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक होत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

प्रियांका गांधी यांच्या याच तक्रारीची केंद्र सरकारने दखल घेतली असून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्रालय यासंदर्भात योग्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करेल आणि त्यातली सत्यता तपासून योग्य ती कायदेशीर कारवाई करेल, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार प्राथमिक चौकशी करण्यात येऊन प्रियंका गांधी यांच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Priyanka Gandhi’s children’s Instagram accounts not hacked; Conclusion of the preliminary inquiry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती