गुजरातेत शस्त्रास्त्रांचे मोठे रॅकेट उघड; आरोपी 2 ते 5 लाखांत खरेदी करून 15 ते 25 लाख रुपयांना विकायचे शस्त्र

वृत्तसंस्था

अहमदाबाद : पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील तिघांना अवैध शस्त्रास्त्रांची विक्री केल्याप्रकरणी अटक केली आहे. यामध्ये लष्कराच्या एका निवृत्त सैनिकाचा समावेश आहे. बेकायदेशीर शस्त्रास्त्रे आणि डुप्लिकेट परवाने देण्याचे रॅकेट आरोपींनी जम्मूमधील एका गन हाऊसच्या मालकाच्या संगनमताने सुरू केले होते.Big arms racket exposed in Gujarat; The accused used to buy weapons for Rs 2 to 5 lakhs and sell them for Rs 15 to 25 lakhs

त्यानंतर सोला पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला गाठले आणि सेवानिवृत्त जवान रसपालकुमार चडगल, गनहाउसचे मालक गौरव कोतवाल आणि व्यवस्थापक संजीवकुमार शर्मा यांना अटक केली. ही कारवाई अत्यंत जोखमीची असल्याने आयपीएस अधिकारी लविना सिन्हा यांनी संपूर्ण ऑपरेशनवर बारीक लक्ष ठेवले.



निवृत्त जवानाच्या नावाने हा घोटाळा सुरू होता

निवृत्त लष्करी जवानाच्या नावाने वारंवार परवाने मिळवून शस्त्रास्त्रे विकण्याचा सगळा धंदा सुरू होता, त्यात गुजराती तरुण शिक्के, परवाने आणि सर्व काही स्वत: बनवत असे. सेक्युरिटीमध्ये काम करण्याचा परवाना असल्याचे भासवून एक निवृत्त लष्करी जवान शस्त्रे विकत घेत असे.

एवढ्या किमतीत शस्त्रे विकणाऱ्या अशा व्यक्तीला पोलिसांनी प्रथम अटक केली होती. पुढे दुवे जोडले जात राहिले आणि अखेर ही लिंक जम्मू-काश्मीरच्या दहशतवादग्रस्त भागात पोहोचली.

या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या अहमदाबाद झोन वनच्या डीसीपी लविना सिन्हा यांच्याशी ‘भास्कर’ने चर्चा केली. त्या म्हणाल्या की, आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींना अटक करायची होती. त्यासाठी आमच्या पोलिसांच्या तीन तुकड्या शस्त्रांसह तेथे पोहोचल्या.

कधीही काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती होती. आरोपीदेखील शस्त्रास्त्र व्यवसायातील असल्याने हल्ला होण्याची भीती होती, पण यासाठी आमची टीम सतर्क होती. आरोपी कुठे असतील आणि त्यांचा मोमेंट काय असेल, हे जाणून घेण्यासाठी आम्ही तांत्रिक पाळत ठेवण्याची मदत घेतली. सोबतच तिथल्या एसएसपीशी संपर्क साधून स्थानिक पातळीवरही पुरेशी मदत मिळाली.

Big arms racket exposed in Gujarat; The accused used to buy weapons for Rs 2 to 5 lakhs and sell them for Rs 15 to 25 lakhs

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात