जात-धर्माच्या राजकारणापेक्षा शिक्षण, रोजगार महत्त्वाचे; अभिजीत दिपकेंचे तरुणांना आवाहन

Abhijeet Dipke

विशेष प्रतिनिधी

पुणे : धर्म आणि जातीच्या मुद्द्यांवरून मतांचे राजकारण करण्यापेक्षा शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या कामगिरीवर सरकारचे मूल्यमापन करा, असे आवाहन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले. पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ओळखाधारित राजकारणावर टीका करत त्यांनी राजकीय पक्षांना विविध प्रश्नांवरून धारेवर धरले. Abhijeet Dipke

“कोणी येतो आणि धर्म धोक्यात आहे, आम्हाला मत द्या असे सांगतो. कोणी जात धोक्यात असल्याचे सांगून मत मागतो. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय बदलणार आहे? तुम्हाला चांगले शिक्षण मिळणार आहे का? तुमच्या घरासमोरचा रस्ता चांगला होणार आहे का? पेपरफुटी थांबणार आहे का?” असे प्रश्न दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उपस्थित केले.

मतदानाचा अधिकार नेमका कशासाठी वापरायचा आणि लोकशाहीत नागरिकांची जबाबदारी काय आहे, याबाबत समाजात जागरूकता निर्माण होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. “सायन्सचे पुस्तक मोठे असते, मॅथ्सचे पुस्तकही मोठे असते. पण नागरिक कसे व्हायचे आणि देशाप्रती आपली जबाबदारी काय आहे, हे शिकवणारे सिव्हिक्सचे पुस्तक सर्वांत छोटे असते,” अशी टिप्पणी त्यांनी केली.



‘विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; जबाबदारांनी राजीनामा का देऊ नये?’

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा उल्लेख करत दिपके यांनी परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. “एवढ्या विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे. काही चूक झाली असेल, तर जबाबदार व्यक्तींनी राजीनामा का देऊ नये? तुम्हाला त्या पदावर बसवले कशासाठी आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ असा टोला लगावला. तसेच नियुक्त्यांमध्ये पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असल्याचा दावाही त्यांनी करत राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.

‘मूलभूत अधिकारांबाबत जागरूक राहा’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक आणि मूलभूत अधिकारांविषयी नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे दिपके म्हणाले.

“आपल्याला हे अधिकार सहज मिळाले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांचे महत्त्व आपल्याला पुरेसे जाणवत नाही. आपल्या मूलभूत अधिकारांबाबत आपण अधिक संवेदनशील आणि जागरूक राहिले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता या प्रश्नांवर सरकारला उत्तरदायी धरण्यासाठी तरुणांमध्ये राजकीय आणि नागरी जागरूकता वाढणे आवश्यक आहे, असेही दिपके यांनी नमूद केले.

‘Religion, caste won’t stop paper leaks’: Abhijeet Dipke

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात