राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र -“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा , पंचनामे तातडीने सुरू करावेत , शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत द्या “


संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळं राज्यातील शेतकरी उध्वस्त झाले आहेत.Raj Thackeray’s letter to CM – “Declare wet drought in the state, start panchnama immediately, give Rs 50,000 assistance to farmers”


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पावसाने सगळीकड हाहाकार माजवला आहे. गुलाब चक्री वादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जबरदस्त बसला आहे . संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळं राज्यातील शेतकरी उध्वस्त झाले आहेत.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टमुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शेतीच सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. राज्यात झालेल्या या अतिवृष्टीनंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागणी केली आहे. तसेच 50 हजारांची मदत तातडीने जाहीर करा अस देखील राज ठाकरे म्हणाले.



राज ठाकरे म्हणाले की ” महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हात तोंडाशी आलेलं पिकासोबत घर दराच सुद्धा नुकसान झालं आहे. अशा वेळेस पंचनामे तातडीने सुरू करावेत. परंतु त्याआधी शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने ताबडतोब करावी.”

आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्ष शीघ्र कृतीची गरज आहे.’वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.’

Raj Thackeray’s letter to CM – “Declare wet drought in the state, start panchnama immediately, give Rs 50000 assistance to farmers”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात