बुधवारी (२९ सप्टेंबर) त्या उपचारांसाठी घरातून बाहेर पडल्या. शिवलीला बाहेर पडल्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरातील वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या आहेत.Bigg Boss Marathi 3: Shivlila Patil is out of Bigg Boss’s house, what exactly is the reason for leaving the house?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : “बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे. इथे फक्त काड्या, कुचाळक्या एवढचं केलं जातं. पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल.मी आठ दिवस जरी राहिले ना तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन ना त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल.”अस शिवलीला पाटील म्हणाल्या.
शिवलीला यांना खरंच घराबाहेर पडावं लागल.परंतु त्या एलिमिनेट किंवा बाद होऊन बाहेर पडल्या नाहीयेत.तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात येत असल्याचं बिग बॉसनं म्हटलं आहे. बुधवारी (२९ सप्टेंबर) त्या उपचारांसाठी घरातून बाहेर पडल्या. शिवलीला बाहेर पडल्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरातील वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या आहेत.
‘कीर्तनकार असताना बिग बॉसच्या घरात जाणं हाच एक मोठा टास्क आहे. कारण बिग बॉसच घर म्हटलं की भांडणं आणि भांडणं म्हणजे अध्यात्माची एकदम विरुद्ध बाजू. भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, या तुकोबांच्या अभंगाप्रमाणेच एक सुशिक्षित मुलगी सुसंस्कृत असू शकते, कीर्तनकार असू शकते आणि आपली मतं ठामपणे मांडू शकते हे दाखवून देण्यासाठी, लोकांचं मत बदलण्यासाठी मी बिग बॉसच्या घरात येत आहे,’ असं शिवलीला पाटील यांनी घरात प्रवेश करण्याआधी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App