मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार?; तपास यंत्रणांना संशय


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणामध्ये मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्येही गुन्हा दाखल असलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. Former Mumbai Police Commissioner Parambir Singh fleeing the country for fear of arrest ?; Suspicion to investigative agencies

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक वेळा परमबीर सिंग यांना समन्स बजावले आहे. मात्र, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. यामुळेच एनआयएला संशय आहे की, अटकेच्या भीतीपोटी परमबीर सिंग हे देश सोडून फरार झाले आहेत. एनआयएने अँटिलिया स्फोटके यासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंह यांना समन्स बजावले होते.



चार दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालकांकडून राज्याच्या गृहविभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर केला आहे. आता यावर गृहविभागाने संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याविषयी माहिती मागवली आहे. त्यानंतर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Former Mumbai Police Commissioner Parambir Singh fleeing the country for fear of arrest ?; Suspicion to investigative agencies

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात