आदित्य ठाकरेंच्या “राजकीय मैदानात” अमित ठाकरेंची एंट्री!!; वरळी कोळीवाड्यातील होळीला अमित ठाकरेंची हजेरी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या “राजकीय मैदानात” अमित ठाकरेंनी एंट्री केली आहे. राज्य सरकारने कोरोनाचे अनेक निर्बंध शिथील केले आहेत. दोन वर्षांनंतर निर्बंधातून सूटका झाल्याने, मुंबईतल्या कोळीवाड्यांनी होळीच्या सणाला बुधवार पासूनच सुरुवात केली आहे.वरळी कोळीवाड्यात साजरी करण्यात आलेल्या होळीला मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. जुन्या परंपरा आणि चालीरिती जपत ही होळी जल्लोषात साजरी केली. Amit Thackeray’s entry in Aditya Thackeray’s “political arena” !!; Amit Thackeray attends Holi in Koliwada, Worli !!

निर्बंधमुक्त होळी

कोरोनाचे महासंकट आणि कोरोनाचे निर्बंध यातून सूटका झाल्यानंतर,आता होळी सणाच्या निमीत्ताने आयुष्यात अनेक रंग भरले जाणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त होळी खेळण्याचा आनंद लूटता येणार आहे. यावेळी मुंबईतील कोळी वाड्यांमध्ये जुन्या पारंपारिक चालीरिती नुसार होळी खेळण्यात आली. यावेळी कोळीबांधवांचा आनंद त्यांच्या चेह-यावरुन ओसंडून वाहत होता. मुंबईचा मूळ नागरिक असलेल्या कोळी समाजानं आपल्या जुन्या परंपरा आणि चालीरिती आजही जपल्या आहेत.राजकीय चर्चांना उधाण

अमित ठाकरे यांनी वरळी येथील होळीला हजेरी लावली. पण, याने मात्र राजकीय चर्चांना उधाण आले, कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात ठाकरेंनी हजेरी लावली होती. यामागे महापालिका निवडणूक तर नाही ना, असे गणित बांधले जात आहे. होळी साजरी करताना मुंबई प्लेयर इतर मतदार संघ अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचा परळी मतदारसंघात का निवडला अशी देखील चर्चा सुरू आहे. मात्र, या विषयावर पत्रकारांशी बोलायला अमित ठाकरे यांनी नकार दिला आहे.

Amit Thackeray’s entry in Aditya Thackeray’s “political arena” !!; Amit Thackeray attends Holi in Koliwada, Worli !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती