हरभजन सिंग बनणार आपचा खासदार, राज्यसभेवर पाठविण्याची तयारी


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आम आदमी पक्षाने अजून एक मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे.Harbhajan Singh to become Aap MP, ready to send to Rajya Sabha

एकीकडे दारुण पराभवामुळे नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबच्या राजकारणातून अस्त झाला असतानाच दुसरीकडे आम आदमी पक्षा एका दिग्गज क्रिकेटपटूला राजकारणाच्या मैदानात आणण्याची तयारी करत आहे. आम आदमी पक्ष भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या राजकीय प्रवेशासाठी पायघड्या पसरत आहे.आम आदमी पक्षाने हरभजनला राज्यसभेवर पाठवण्यासाठी तयारी केली आहे. तसेच त्याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे नेतृत्वही देण्याची शक्यता आहे.नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

आपच्या लाटेसमोर पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्ष पुरता गारद झाला होता. तसेच आता पंजाब आणि दिल्ली अशा दोन राज्यांत आपची सत्ता स्थापन झाली असून, आता आपला राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत.

Harbhajan Singh to become Aap MP, ready to send to Rajya Sabha

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती