जगातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतातही चिंता


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र यातच काही युरोपियन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी जगभरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली आहे.India is also worried about the growing number of corona patients in the world

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.बैठकीत 27 मार्चपासून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून



सोबतच कोरोना बाबत काळजी घेत लसीकरण आणि जीनोमिक सिक्वेंनसिंग यासारख्या बाबींवर भर देण्यात आला. तसेच बैठकीदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोविड19 लसीकरण कार्यक्रम आणि 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबत आढावा घेतला.

चीन, सिंगापूर, हाँगकाँग, व्हिएतनाम आणि काही युरोपीय देशांमध्ये वाढती प्रकरणे पाहता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ञांसह झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्र्यांनी जीनोमिक सिक्वेन्सिंग, तपासण्यांमध्ये वाढ आणि अत्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य सचिव राजेश भूषण, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले, फार्मास्युटिकल्स विभागाचे सचिव एस अपर्णा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष एनके अरोरा या बैठकीला उपस्थित होते.

India is also worried about the growing number of corona patients in the world

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात