चीनमध्ये कोरोनाने पुन्हा पसरले हातपाय; अनेक शहरात लावलाय लॉकडाऊन


वृत्तसंस्था

बीजिंग : जगभरात कोरोना नियंत्रणात आला. मात्र, चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये अनेक शहरांत लॉकडाऊन लावला आहे. रविवारी कोरोनाच्या एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. Corona re-spreads in China; Lockdown in many cities



सोमवारी चीनमध्ये कोरोना विषाणूचे २३०० नवीन रुग्ण आढळले होते. परंतू आज मंगळवारी ही रुग्णसंख्या दुप्पटीपेक्षा जास्त वाढली आहे. आज ५२८० एवढे कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका जिलीन प्रांताला बसला आहे. चीनमध्ये जवळपास १० शहरे आणि काऊंटीमध्ये ल़ॉकडाऊवन लावण्यात आला आहे. यामध्ये चीनचा टेक हब असलेल्या शेंझेन शहराचा देखील समावेश आहे. यामुळे तेथील सुमारे १७ दशलक्ष लोकांना घरात रहावे लागले आहे.

Corona re-spreads in China; Lockdown in many cities

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात