वृत्तसंस्था
इस्लामाबाद : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानला उत्तर कोरियाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानातील उत्तर कोरियाच्या दूतावसात मद्याचा साठा असल्याच्या संश्यावरून पोलिसांनी छापा टाकला. त्यावरून दोन देशात जुंपली आहे. पाकिस्तानने छापा टाकल्याने कोरियाचा हुकूमशाह किम जोंग संतापला असून पुन्हा असं कराल तर… अशी धमकीच दिली आहे. Kim Jong Un Angry On Pakistan
उत्तर कोरियाच्या इस्लामाबाद येथील दूतावासावर पाकिस्तानी पोलिसांनी छापा टाकला असून, त्यामुळे उत्तर कोरियामध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दूतावासावर बेकायदा छापा टाकल्याचे दूतावासाने म्हटले आहे. पोलिसांनी दूतावासाचेही नुकसान केले आहे. या घटनेवर उत्तर कोरियाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या दूतावासाच्या वतीने ही घटना व्हिएन्ना कराराचे घोर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. छापेमारीत दूतावासाचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more