रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीपासून 27 किमी अंतरावर, 64 किलोमीटर लांबीचा लष्कराचा ताफा


विशेष प्रतिनिधी

किव्ह (युक्रेन) : रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने पुढे जात आहे. अमेरिकन सॅटेलाइट इमेजिंग कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीने जारी केलेल्या फोटोंमध्ये असे दिसून आले आहे की सोमवारी रशियन सैन्य राजधानी कीव्हपासून सुमारे 27 किमी अंतरावर असलेल्या अँटोनोव्ह विमानतळाजवळ पोहोचले होते. सुमारे 64 किलोमीटर लांबीचा लष्कराचा ताफा आहे.Russia’s military contingent, 64 km long, 27 km from the Ukrainian capital

मॅक्सर टेक्नॉलॉजीने जारी केलेल्या फोटोमध्ये रशियन सैन्याचा ताफा 40 मैल म्हणजेच 64 किमी लांब असल्याचे सांगण्यात आले आहे. ताफ्यात रणगाडे आणि चिलखती ट्रक आणि लष्करी वाहनांचा समावेश आहे. हा रशियन काफिला पाहून असे दिसते की तो युक्रेनियन शहरांना पूर्णपणे वेढा घालण्याच्या तयारीत आहे.



मॅक्सारने सांगितले की, रशियन सैनिकांचा हा ताफा एवढा मोठा आहे की, अनेक ठिकाणी जामसारखी परिस्थिती आहे.मॅक्सारने सांगितले की, रशियन सैनिकांचा हा ताफा एवढा मोठा आहे की, अनेक ठिकाणी जामसारखी परिस्थिती आहे. दक्षिणी बेलारुसमध्ये जास्त सेना आणि लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. हा परिसर यूक्रेनच्या बॉर्डरपासून 32 ‘े दूर आहे.

मॅक्सार टेक्नॉलॉचीच्या फोटोमध्ये खुलासा झाला आहे की, दक्षिणी बेलारुसमध्ये जास्त सेना आणि लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.यापूर्वी, यूएस संरक्षण विभागाने असेही म्हटले होते की, युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या सुमारे 75% रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत राजधानी कीव्ह ताब्यात घेण्यावरून रशियन आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये घनघोर युद्ध होण्याची शक्यता वाढली आहे

राजधानी कीवसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाºया रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खार्कीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चचेर्ची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुस?्या फेरीची शक्यता आहे.

Russia’s military contingent, 64 km long, 27 km from the Ukrainian capital

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात