रक्ताच्या वारसदारांकडून दलितांची दिशाभूल; आंबेडकर यांचे नाव न घेता डॉ. राऊत यांचा हल्ला


वृत्तसंस्था

खामगाव (बुलढाणा) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसदार नाही. पण, त्यांच्या विचारांचा वारसदार आहे. माझा हात जरी कापला तरी माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून ‘जय भीम’ हा आवाज ऐकू येईल, असा शाब्दिक हल्ला ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता यांच्यावर हा शाब्दिक हल्ला त्यांनी चढविला. Misleading Dalits by blood heirs; Without mentioning Ambedkar’s name, Dr. Raut’s attack


NITIN GADKARI : NH48 मुंबई- दिल्ली 12 तासात ; नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना



खामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे विदर्भ विभागीय अध्यक्ष गौतम गवई यांनी आयोजित केलेल्या आंबेडकरी कलावंत व मजूर यांच्या मेळाव्यात डॉ. राऊत बोलत होते. आंबेडकरी समाजाची दिशाभूल करणाऱ्या नेत्यामध्ये आंबडेकरी परिवाराचे सदस्य आहेत म्हणून विश्वास ठेवू नका, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.

“गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुटूंबातील सदस्यांना महत्वाची पदे द्या असे कुठेही म्हटले नाही. रक्ताचे वारसदार असलेले हे नेते पांघरूण घेऊन समाजाला चुकीच्या दिशेने नेत आहेत, असा आरोप डॉ. राऊत यांनी केला.

भाजपशी साटेलोटे केल्याचा गौप्यस्फोट

“प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटीची वेळ मागितली. मात्र त्याना मला भेटीची वेळ दिली नाही. मात्र भाजप नेत्यांनी वेळ मागितली तेव्हा त्यांना मात्र आंबडेकर यांनी वेळ दिली. यावरून तुम्ही सर्व काही समजून जा, अशा शब्दात भाजप आणि आंबडेकर यांच्या साटेलोटे असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

Misleading Dalits by blood heirs; Without mentioning Ambedkar’s name, Dr. Raut’s attack

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात